Chandrashekar Bawankule : मानखुर्दमधील २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी घेतली भेट


मुंबई : मानखुर्द (पूर्व) मंडाला येथील २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांच्या प्रश्नावर शासन नियमांच्या चौकटीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिली. (Bawankule)



मेधा पाटकर यांनी गुरुवारी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन मानखुर्द (पूर्व)मंडाला परिसरातील स्वयंविकास योजनेअंतर्गत होत असलेल्या सुमारे २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबे अनेक वर्षांपासून त्या परिसरात वास्तव्यास असून, त्यांच्या पुनर्वसन व घरांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच संबंधित जागेची कागदपत्रे, विविध शासकीय विभागांशी झालेला पत्रव्यवहार आणि यापूर्वी झालेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी महसूल मंत्र्यांसमोर मांडली. तसेच त्यांनी या गरीब कुटुंबांच्या स्वयंविकास गृहनिर्माण प्रकल्पासाठी शासकीय भूखंड हस्तांतरित करण्याची आग्रही मागणी केली. या नियोजित प्रकल्पाचा प्रत्यक्ष पाया रचण्यासाठी मंडाला येथील ६ हजार ७७.५५ चौ. मी. चा भूखंड मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाटकर यांनी सांगितले. (Social Work)



यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी निवेदनाची सविस्तर दखल घेत संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि वस्तुस्थितीची पडताळणी करून कायदेशीर व प्रशासकीय बाबींचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल, यासाठी नियमांच्या अधीन राहून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८

Central Railway Block : कसारा मार्गावर १५ रात्रींचा ब्लॉक; टिटवाळा स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता