Smriti Mandhanaभारतीय संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज: स्मृती मानधना

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर, अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिने आपण अधिक मोठी जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे मान्य केले आहे. एका मुलखातीत मानधनाला भारतीय महिला संघाच्या कर्णधारपद हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू आहे. विचारणा झाल्यास भारताचे नेतृत्व करण्यास तुम्ही तयार आहात का? यावर ती म्हणाली, "हो, नक्कीच. मी तयार आहे."(India Womens Cricket Team)



महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याबाबत मानधना पुढे म्हणाली, "आत्मपरीक्षण करणे आणि चुकांमधून शिकणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, आपण आपल्या मागील चुकांमधून पुरेसा बोध घेतलेला नाही आणि त्या चुकांची पुनरावृत्ती करत राहिलो आहोत. "आता पुढे पाहताना, २०२८ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत या फॉरमॅटकडे कशा प्रकारे पाहायचे आणि एक संघ म्हणून आपल्याला काय करायचे आहे, याचा एक स्पष्ट रोडमॅप असणे आवश्यक आहे."



भारतीय महिला संघ मे महिन्याच्या उत्तरार्धापासून इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्याची सांगता लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या महिलांच्या ऐतिहासिक अशा पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याने झाली; या सामन्यात पाहुण्या संघाने २७० धावांनी दणदणीत विजय मिळवला.



"लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या महिलांच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचा भाग असणे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो सामना जिंकणे, ही एक अद्भुत गोष्ट होती. "भारताच्या या ऐतिहासिक विजयात योगदान देणे विशेष होते. लहानपणी आम्ही सर्वजणी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहायचो, त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर ती संधी मिळणे हा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरला," असे मंधाना म्हणाली.मंधानाने या सामन्याच्या दोन्ही डावांत सलग अर्धशतके झळकावली, तर भारताची आणखी एक महत्त्वाची क्रिकेटपटू ठरली ती म्हणजे यस्तिका भाटिया. लॉर्ड्सवर महिलांच्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली.

Comments
Add Comment

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील

India vs Sri Lanka 2nd Test : जयस्वाल-फर्नांडोच्या वादानंतर आणखी ड्रामा; विकेट पडताच श्रीलंकन खेळाडूचा संताप, मैदानावर नेमकं काय घडलं?

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि