Matsya Sampada Yojana : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचवा; नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची (Matsya Sampada Yojana) प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना विविध योजनांच्या अंमलबजावणीचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या. (Nitesh rane)


या बैठकीला पदुम सचिव रामास्वामी एन., मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, राज्यातील प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Matsya Sampada Yojana )





नितेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला मच्छिमारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात नियमित विशेष शिबिरे आयोजित करून योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवावी. लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विभागनिहाय नियोजन करून नियमित प्रगतीचा आढावा घ्यावा आणि त्यानुसार कृती आराखडा तयार करावा. (Fisherman)


बैठकीत विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीचाही आढावा घेण्यात आला. पुणे (Pune) आणि नागपूर (Nagpur) येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून, मुंबई विभागातील वसई आणि नागपूर विभागातील गडचिरोली येथेही प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.





याशिवाय, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आंतरराज्य अभ्यास दौऱ्यांचाही आढावा घेण्यात आला. इतर राज्यांतील आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा फायदा राज्यातील मत्स्यपालकांना मिळावा, यासाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. (Government Scheme)



बैठकीत निमखाऱ्या पाण्यात सुपर-इंटेन्सिव्ह पद्धतीने कोळंबी (Kolambi) संवर्धन योजनेवरही चर्चा झाली. या योजनेसाठी आवश्यक कार्यपद्धती आणि प्रकल्प अहवाल संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यात आले असून, प्राप्त प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


Comments
Add Comment

Satellite Phone: खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय

खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले

Kokan Railway : गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास भेट! कोकण मार्गावर विशेष गाड्या आणि नवीन थांबे; पाहा पूर्ण वेळापत्रक

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला असताना कोकण (Konkan) गाठणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी

Mumbai Seaplane : मुंबई-रत्नागिरी सी-प्लेन सेवेला वेग; कोकण पर्यटनासाठी मोठे पाऊल

मुंबई : कोकणातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरीदरम्यान (Ratnagiri) सी-प्लेन सेवा सुरू

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या