Direct Tax Collection : देशाचे प्रत्यक्ष कर संकलन 16.40 टक्क्यांनी वाढून पोहोचले 6.51 लाख कोटी रुपयांवर

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 13 जुलैपर्यंतचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.40 टक्क्यांनी वाढून 6.51 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. यामध्ये कॉर्पोरेट कर संकलनाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या कालावधीत निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन 22 टक्क्यांनी वाढून 2.40 लाख कोटी रुपये झाले. तसेच, एकूण प्रत्यक्ष कर संकलन 16.11 टक्क्यांच्या वाढीसह 7.73 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.



आयकर विभागाने मंगळवारी आकडेवारीद्वारे माहिती दिली की, बिगर-कॉर्पोरेट कर (NCT) मधून महसूल संकलन सुमारे 12 टक्क्यांनी वाढून 3.84 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. या कालावधीत सरकारने 1.22 लाख कोटी रुपयांचे कर परतावे (Refund) जारी केले असून, ते मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 14.57 टक्के अधिक आहेत. आयकर विभागाच्या माहितीनुसार, एकूण आधारावर प्रत्यक्ष कर संकलनही 16.11 टक्क्यांनी वाढून 7.73 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. यामध्ये कॉर्पोरेट करातून 3.35 लाख कोटी रुपयांहून अधिक आणि बिगर-कॉर्पोरेट करातून सुमारे 4.12 लाख कोटी रुपयांचा समावेश आहे.



आयकर विभागाने सांगितले की, 13 जुलैपर्यंत चालू आर्थिक वर्ष 2026-27 साठीच्या एकूण प्रत्यक्ष कर (डीटी) संकलन, कर परतावे (रिफंड) आणि निव्वळ प्रत्यक्ष कर (DT) संकलनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती आयकर विभागाच्या राष्ट्रीय संकेतस्थळावरील संबंधित लिंकवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 26.97 लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संकलित करण्यात आलेल्या 23.40 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक

CM Devendra Fadnavis : 'भारताचे संविधान आणि लोकशाही प्रत्येक व्यक्तीला मोठी संधी देऊ शकते'

नागपूर : तरुणांना मुख्यमंत्री किंवा

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी