Nashik Crime : नाशिकच्या भावली धरणाजवळ पर्यटकांवर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं ?

Nashik Crime : पाऊस झाल्यानंतर नाशिकमधील पर्यटन स्थळांवर गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील पर्यटन बिंदू असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात एका खलबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर टवाळखोरांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Nashik Crime News)



 

नेमकं काय घडलं ?


नाशिक शहरात आता पावसानंतर हळूहळू हिरवाई पसरण्यास सुरुवात झाल्याने शहरात राहणाऱ्या पुनम भागवत या रविवारी आपल्या कुटुंबातील ८ सदस्यांसह भावली धरणावर फिरण्यासाठी गेल्या होत्या. फिरूमन झाल्यानंतर ये घरी जाण्यासाठी निघाले मात्र दोन टवाळखोरांनी भागवत यांच्या कुटुंबातील एका महिलेची छेड काढली. (Nashik Crime News)


या प्रकारावर संतापलेल्या भागवत आणि त्यांच्या पतीने आक्षेप घेत, “सार्वजनिक ठिकाणी असे वागणे योग्य आहे का?” असा जाब विचारला. यावरून टवाळखोरांनी वाद कुटूंबीयांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली धक्कादायक म्हणजे वार घालत थेट अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न हुल्लडबाजांनी केला. कुटुंबियांनी प्रतिकार केल्यावर ते तिथून पळून गेले. मात्र हा थरार इथेच थांबला नाही. (Nashik Crime News)




१० ते १५ किलोमीटर थरारक पाठलाग


काही अंतरावर उभा असलेल्या एका टेम्पो जवळील ८ ते १० जण पुन्हा भागवत कुटुंबाशी हुज्जत घालू लागले. घाबरलेल्या कुटूंबियांनी वाद वाढू नये म्हणून भागवत कुटुंब आपल्या टाटा सफारी गाडीतून तिथून निघून गेले. मात्र, चिडलेल्या टवाळखोरांनी एका पांढऱ्या रंगाच्या बलेनो कारमधून आणि दुचाकीवरून त्यांचा पाठलाग सुरू केला. गुंडांनी जवळपास १५ किलोमीटरपर्यंत गाडीचा थरारक पाठलाग केला. (Nashik Crime News)


पाठलाग करत असताना हातात लोखंडी रॉड आणि लाकडी दांडके घेऊन धावत्या गाडीवर ठिकठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात सफारी कारच्या समोरील आणि मागील काचा पूर्णपणे फुटल्या. गाडीत बसलेल्या महिलांना काचा लागून किरकोळ दुखापतही झाली आहे. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत चालकाने प्रसंगावधान राखत गाडी वेगाने पळवून थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. (Nashik Crime News)




पोलिसांकडून कारवाई सुरु


दरम्यान, भागवत कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. अंबड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली आहे. व्हायरल व्हिडिओ आणि गाडीच्या क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत ६ ते ७ संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता पर्यटकांकडून केली जात आहे. मात्र पर्यटन स्थळावर घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Fifa World cup Semi-final 2026 : फ्रान्स आणि स्पेनचा महामुकाबला; विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीसाठी चुरस

आर्लिंग्टन, टेक्सास: फुटबॉल विश्वाचे लक्ष आता मंगळवारी, १४ जुलै रोजी एटी अँड टी स्टेडियमवर होणाऱ्या फिफा

FIFA world Cup 2026 : "हाच संघ जिंकणार फिफा वर्ल्ड कप २०२६" - ऑलिव्हर कानची भविष्यवाणी !

टेक्सास : फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, दिग्गज जर्मन गोलरक्षक ऑलिव्हर कान यांनी

Nashik Crime : पर्यटकांवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांची तात्काळ कारवाई, ९ जण ताब्यात ; त्यादिवशी नेमकं काय घडलं पोलिसांनी सर्वच सांगितलं

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील पर्यटन बिंदू असलेल्या भावली धरण (Bhavali Dam) आणि धबधबा परिसरात एका खलबळजनक घटना घडली आहे.

Beed Cyber Crime : IT इंजिनिअरच ठरला सायबर क्राईमची शिकार; ‘SEBI’चे बनावट प्रमाणपत्र पाठवून IT इंजिनियरची लाखोंची फसवणूक

बीड : बीड जिल्ह्यात सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाची चांगली माहिती असलेल्या

Pratap Sarnaik : एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

"झाडे लावा, झाडे जगवा; पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी" – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :

MHADA Lottery 2026 : आनंदवार्ता! आता घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाची ५ हजार घरांची मेगा लॉटरी लवकरच

- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी