Tuesday, July 14, 2026

FIFA World Cup 2026 : गोल, ग्लॅमर आणि अब्जावधींची कमाई! मेस्सीपासून एम्बाप्पेपर्यंत सुपरस्टार्सच्या प्रेमकथा आणि संपत्तीची चर्चा

FIFA World Cup 2026 : गोल, ग्लॅमर आणि अब्जावधींची कमाई! मेस्सीपासून एम्बाप्पेपर्यंत सुपरस्टार्सच्या प्रेमकथा आणि संपत्तीची चर्चा

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या चार संघांचे सुपरस्टार खेळाडू केवळ मैदानावरील कामगिरीमुळेच नव्हे, तर त्यांच्या अब्जावधींच्या कमाईमुळे आणि चर्चेत असलेल्या प्रेमकथांमुळेही जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. लिओनेल मेस्सी, लमिन यामाल, हॅरी केन आणि किलियन एम्बाप्पे यांचे वैयक्तिक आयुष्य, जोडीदार आणि संपत्ती याविषयी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

लिओनेल मेस्सी – बालपणीच्या प्रेमाला आयुष्यभराची साथ :

अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) हा आपल्या बालमैत्रीण अँटोनेला रोकुझोसोबतच्या नात्यामुळे नेहमीच आदर्श मानला जातो. दोघांनी 2017 मध्ये विवाह केला असून त्यांना तीन मुले आहेत. अँटोनेला मॉडेल, उद्योजिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून ती मेस्सीच्या प्रत्येक मोठ्या सामन्यात त्याला प्रोत्साहन देताना दिसते.

विश्वचषकातील शानदार कामगिरीसोबतच मेस्सीची आर्थिक ताकदही प्रचंड आहे. फोर्ब्सनुसार त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे १४० दशलक्ष डॉलर (सुमारे १,३५० कोटी रुपये) आहे. यातील निम्मी कमाई मैदानावरील खेळातून, तर उर्वरित जाहिराती आणि ब्रँड करारांमधून होते. (FIFA World Cup 2026)

लमिन यामाल – तरुण सुपरस्टार आणि चर्चेतील रिलेशनशिप :

स्पेनचा १९ वर्षीय स्टार लमिन यामाल (Lamine Yamal) विश्वचषकातील सर्वात चर्चेतील युवा खेळाडू ठरला आहे. विक्रमी गोलांसह त्याने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आहेत.

यामालच्या वैयक्तिक आयुष्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. अर्जेंटिनाची गायिका निकी निकोलसोबतचे नाते संपल्यानंतर तो सध्या स्पॅनिश इन्फ्लुएन्सर इनेस गार्सियासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेली इनेस अनेकदा स्टेडियममध्ये यामालला पाठिंबा देताना दिसते. (FIFA World Cup 2026)

फोर्ब्सच्या अंदाजानुसार, यामालचे वार्षिक उत्पन्न ४३ दशलक्ष डॉलर (सुमारे ४१० कोटी रुपये) आहे.

हॅरी केन – शाळेतील मैत्रीणच झाली जीवनसाथी :

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन (Harry Kane) हा मैदानावरील सातत्यपूर्ण कामगिरीइतकाच कौटुंबिक आयुष्यासाठीही ओळखला जातो. त्याने आपल्या शाळामैत्रीण केटी गुडलँडसोबत २०१९ मध्ये विवाह केला असून त्यांना चार मुले आहेत.

इंग्लंडसाठी सातत्याने गोल करणाऱ्या केनचे वार्षिक उत्पन्न ४१ दशलक्ष डॉलर (सुमारे ३९० कोटी रुपये) असल्याचे फोर्ब्सने नमूद केले आहे. मैदानावरील कामगिरीबरोबरच ब्रँड एंडोर्समेंटमधूनही त्याला मोठी कमाई होते. (FIFA World Cup 2026)

किलियन एम्बाप्पे – खाजगी आयुष्य कायम चर्चेत :

फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappe) आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच गोपनीयता राखतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याचे नाव स्पॅनिश अभिनेत्री एस्टर एक्सपोसिटोसोबत जोडले जात आहे. यापूर्वी मॉडेल रोझ बर्ट्राम आणि इनेस राऊ यांच्यासोबतही त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

आर्थिकदृष्ट्या एम्बाप्पे हा या यादीतील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. फोर्ब्सच्या अंदाजानुसार त्याचे वार्षिक उत्पन्न ९५ दशलक्ष डॉलर (सुमारे ९१० कोटी रुपये) आहे. यामध्ये मैदानावरील खेळाबरोबरच जाहिराती आणि ब्रँड करारांचा मोठा वाटा आहे.

प्रेमात कोण श्रीमंत, पैशात कोण आघाडीवर?

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेले हे चार सुपरस्टार मैदानावर आपल्या संघासाठी झुंज देत असताना मैदानाबाहेरही त्यांच्या प्रेमकथा आणि अब्जावधींची कमाई चर्चेचा विषय ठरत आहेत. मेस्सीचे आयुष्यभर टिकलेले प्रेम, केनचे शाळेतील प्रेमसंबंध, यामालचे तरुण वयातील रिलेशनशिप आणि एम्बाप्पेचे चर्चेत असलेले खासगी आयुष्य—या सगळ्यामुळे फुटबॉलप्रेमींमध्ये या स्टार्सबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. (FIFA World Cup 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >