Tuesday, July 14, 2026

FIFA world Cup 2026 : "हाच संघ जिंकणार फिफा वर्ल्ड कप २०२६" - ऑलिव्हर कानची भविष्यवाणी !

FIFA world Cup 2026 :

टेक्सास : फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी, दिग्गज जर्मन गोलरक्षक ऑलिव्हर कान यांनी भविष्यवाणी केली आहे की, उर्वरित चार संघांपैकी एक संघ ही स्पर्धा जिंकेल. ऑलिव्हर कान यांच्या मते, फ्रान्स हा फिफा विश्वचषक २०२६ जिंकण्यासाठी एक प्रबळ दावेदार आहे. त्यांचा विश्वास आहे की, संघातील संतुलन आणि शेवटच्या क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याच्या क्षमतेमुळे, कोणत्याही संघाला फ्रान्सला हरवणे सोपे जाणार नाही.२०२६ फिफा विश्वचषकाचा पहिला उपांत्य फेरीचा सामना बुधवार, १५ जुलै रोजी डॅलस स्टेडियमवर फ्रान्स विरुद्ध स्पेन यांच्यात खेळला जाईल. दुसरा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात होईल. यापूर्वी २००६ मध्ये १६ संघांच्या फेरीत फ्रान्स आणि स्पेन एकमेकांसमोर आले होते, ज्यात फ्रान्सने ३-१ ने विजय मिळवला होता. (Fifa World Cip 2026 )

 
View this post on Instagram
 

A post shared by FIFA World Cup (@fifaworldcup)

ऑलिव्हर कानची भविष्यवाणी

जी५ च्या शोवर बोलताना ऑलिव्ह कान म्हणाले, "आतापर्यंतच्या कामगिरीच्या आधारावर जर मला एका संघाची निवड करायची असेल, तर मी कदाचित फ्रान्सची निवड करेन. संतुलन, संघातील खेळाडूंची संख्या आणि वेगवेगळ्या प्रकारे सामने जिंकण्याच्या क्षमतेच्या बाबतीत ते सर्वोत्तम संघ वाटतात. तथापि, या चार संघांमध्ये फारसा फरक नाही आणि त्यांच्यापैकी कोणताही संघ विश्वचषक जिंकू शकतो."(Oliver khan)

कान यांच्या मते उपांत्य फेरीसारख्या निर्णायक सामन्यांमध्ये बचाव फळी महत्त्वाची ठरते. या स्पेर्धेत फ्रान्सची बचाव फळी सर्वात उत्कृष्ट आहे. यामुळे स्पेनसाठी हा सामना सोपा जाणार नाही. त्यांच्या मते स्पेनला संयामने खेळावे लागणार आहे, मैदानाच्या विशिष्ट भागांमध्ये अधिक खेळाडू तैनात करणे आणि बचावात्मक संतुलन राखणे फ्रान्स सारख्या संघासमोर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कान म्हणाले की, सामन्याचा निकाल मिडफिल्डमधील लढाईवर अवलंबून असू शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, केवळ तीव्र दबाव टाकणे पुरेसे ठरणार नाही, तर योग्य वेळी हुशारीने दबाव टाकणे निर्णायक ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, जो संघ मिडफिल्डवर चेंडूचा ताबा कायम ठेवेल आणि प्रतिस्पर्धी संघाला तिथून खेळण्यापासून रोखेल, त्याच्या जिंकण्याची शक्यता अधिक असेल. (France vs Spain)

आपल्या गोलरक्षणाच्या अनुभवाच्या आधारे, कान यांनी आधुनिक फुटबॉलमधील गोलरक्षकाच्या बदलत्या भूमिकेवरही चर्चा केली. त्यांच्या मते, आज गोलरक्षक केवळ एक गोलरक्षक नसून, तो आक्रमण सुरू करण्यात आणि संघाचे व्यवस्थापन करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो.तो म्हणाला, "आजचे गोलकीपर हे मूलतः पहिले आक्रमणकर्ता आणि शेवटचे बचावकर्ता, दोन्ही असतात... गोलकीपरचा एक चांगला निर्णय किंवा एक चूक सामन्याचा निकाल पूर्णपणे बदलू शकते. सर्वोत्तम संघ आपल्या गेम प्लॅनला चिकटून राहतात. ते घाबरत नाहीत, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात आणि दबावाखाली असतानाही चांगले निर्णय घेत राहतात." (Sports)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >