Kolhapur Suicide : बारशापूर्वीच नवविवाहितेची आत्महत्या; कोल्हापूरातील धक्कादायक घटना

मुलगी झाल्याने सासरच्यांकडून छळ, गळफास घेऊन नवविवाहितेची आत्महत्या 


कोल्हापूर: कोल्हापूरच्या (Kolhapur) राजारामपुरी परिसरात २१ वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी गळफास (Hanging) घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर मृत विवाहितेच्या कुटुंबीयांनी पतीसह सासरच्या मंडळींवर मुलगी जन्माला आल्यामुळे छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मृत विवाहितेचे नाव अस्मिता काटकर असे असून, त्यांच्या मुलीचा बारसा १५ जुलै रोजी होणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Suicide new)

मृत महिलेच्या आई आणि भावाने सासरच्या मंडळींवर मानसिक व शारीरिक छळ (Mental and physical harassment) केल्याचा आरोप केला आहे. मुलगा न झाल्यामुळे आणि मुलगी जन्माला आल्याने अस्मितावर सतत दबाव टाकला जात होता, असा दावा त्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी अस्मिताचे पती, सासू आणि सासरे बारशासाठी हॉल पाहण्यासाठी घराबाहेर गेले होते. अस्मिता घरी एकट्या असताना त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून बेडरूममध्ये छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. (Kolhapur Suicide)

काही वेळाने कुटुंबीय घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. अनेकदा हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी अस्मिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील (Death) नेमके कारण आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची चौकशी सुरू असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण आणि

Ganeshotsav 2026 Sound Restrictions : गणेशोत्सवात ‘प्लाझ्मा साऊंड’ आणि लेझरला बंदी; डेसिबल मर्यादा ओलांडल्यास मंडळांवर होणार थेट कारवाई

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी महत्त्वाच्या

Samruddhi Expressway Traffic Diversion : टाकळीवाडीत गॅस वाहिनीला गळती; खबरदारी म्हणून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळवली

छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाने

Nepal Flood : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे शर्थीचे प्रयत्न; ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जणांशी संपर्क

मुंबई : नेपाळ येथील महापुरामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील नागरिक व धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक यांच्या

FSSAI Raid : निकृष्ट दर्जाच्या हिंगावर FSSAIची कारवाई; दोन मोठ्या मसाला ब्रँडच्या विक्रीवर बंदी

मुंबई : ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय अन्न सुरक्षा आणि

Jalgaon News : नदीत बुडणाऱ्या लेकाला वाचवण्यासाठी बाप धावला पण नियतीनं बापालाच हिरावलं , मुलगाही बेपत्ता

Jalgaon News : जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील पिता-पुत्र