Nashik News : एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Maharaj Palkhi) सोहळ्यात त्र्यंबकेश्वरहून (Trimbakeshwar) सहभागी झालेल्या एका वृद्ध वारकरी महिलेचे आज (सोमवारी) पहाटे अहिल्यानगर येथे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. सुमनबाई मधुकर कांडेकर (वय ६५, सध्या रा. तळेगाव अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर) असे या मृत वारकरी माऊलीचे नाव आहे. विठुरायाच्या भेटीआधीच मरण पदराशी आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nashik : नाशिकच्या क्रीडाक्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. आज प्रत्येक नाशिककर अभिमानाने श्रावणी सांगळे (Shravani Sangale) हिचे नाव घेत आहे, आणि त्याला कारणही तसंच ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar District) मार्गक्रमण करत आहे. या वारीत त्र्यंबकेश्वरहून सुमनबाई मधुकर कांडेकर या सहभागी झाल्या होत्या. वारीच्या आनंदात विठुरायाच्या भेटीसाठी ही पावले पुढे चालत होती. मात्र मुक्कामासाठी थांबलेल्या सुमनबाई यांना सोमवारी (दि.१३) रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (Goregaon Mulund Link Road) प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम ...
घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घटनेची माहिती मिळताच संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे आणि विश्वस्त नवनाथ गांगुर्डे यांनी तात्काळ अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी करत पुढील आवश्यक बाबींसाठी मदत केली. यानंतर रुग्णालयात कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह (Dead Body) त्यांच्या गावाकडे पाठविण्यात आला आहे.
विठुरायाच्या भेटीआधीच काळाने अशाप्रकारे त्यांना हिरावून घेतल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनाही मोठा धक्का बसला. घटनेमुळे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.




