Nitesh Rane : आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मंत्री नितेश राणेंचा घणाघात; हिंदू समाजाला सावधान राहण्याचे आवाहन


मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान(Amir Khan) याच्या तिसऱ्या लग्नावरून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. वयाची साठी ओलांडलेल्या आमिर खानने आपली प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी या विवाहावरून आमिर खानवर अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. आमिर खानला 'लव्ह जिहादचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' असे संबोधत नितेश राणे यांनी समस्त हिंदू समाजाला या प्रकारांपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा पद्धतीच्या नटांना मोठे करायचे की नाही याचा गांभीर्याने विचार करून, हिंदू तरुणांनी आमिर खानच्या आगामी चित्रपटांवर बहिष्कार टाकावा की काय, अशी स्थिती असल्याचे राणे म्हणाले.



शिर्डी(Shirdi) येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "जेव्हा अशा काही गोष्टी आपल्या समाजात घडतात, तेव्हा या पद्धतीच्या लोकांकडे 'लव्ह जिहादचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर' म्हणूनच पाहावे लागते. त्यामुळे मी माझ्या समस्त हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की, तुम्ही या बाबतीत कमालीचे सतर्क आणि सावधान राहिले पाहिजे. असे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर जिथे कुठे दिसतील, तिथे त्यांच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार झाला पाहिजे."



नितेश राणे पुढे म्हणाले की, जेव्हा मोठे सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात असे निर्णय घेतात, तेव्हा हिंदू समाजाने त्यावर सखोल विचार करणे गरजेचे आहे. आमिर खान हा अशा कृत्यांतून लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडरच बनत चालला आहे. जे हिंदू तरुण त्याचे चित्रपट आवर्जून पाहतात, त्यांनी अशा नटांना डोक्यावर घेण्यापूर्वी आणि मोठे करण्यापूर्वी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जे लोक अशा व्यक्तींना आपले आदर्श किंवा सेलिब्रिटी मानतात, त्यांनी आपली मानसिकता तपासण्याची खरी गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.



अभिनेता आमिर खानने गौरी स्प्रॅट हिच्याशी केलेले हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याचे दोन विवाह झाले असून दोन्ही पत्नींसोबत त्याचा काडीमोड (घटस्फोट) झाला आहे. आमिरला त्याच्या आधीच्या दोन लग्नांपासून तीन मुले आहेत, तर गौरीला तिच्या पहिल्या विवाहापासून एक मुलगा आहे.

Comments
Add Comment

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये

Mumbai Smart Turf Policy : मुंबईत महापालिकेद्वारे 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण?

- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी. - भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची

Plastic Bottle Ban : मुंबई महापालिका सर्व कार्यालयांमध्ये पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्सला बंदी

- महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रमुख कार्यालये व