Nashik : 2025-26 आर्थिक वर्षात तब्बल 17,543 कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवहार; शहरातील आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम

Nashik : नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात नाशिक शहराच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक मालमत्ता व्यवहार ठरला आहे. नाशिक शहराच्या हद्दीत 2025-26 या आर्थिक वर्षात अंदाजे 17,543 कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवहार (Property Transactions) नोंदविण्यात आले आहे.


महत्त्वाचे म्हणजे शहराच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक मालमत्ता व्यवहार ठरला आहे. यामुळे नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्राची (Real estate sector) सातत्याने होत असलेली वाढ अधोरेखित झाली आहे. हा अंदाज नाशिक महानगरपालिकेला ((Nashik Municipal Corporation) मालमत्ता नोंदणीदरम्यान मिळालेल्या 1 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था उपकराच्या ((Local self-government bodies) उत्पन्नावर आधारित आहे.


17,543 कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवहार


महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात महापालिकेला या उपकरातून सुमारे 17543 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. सध्याच्या नोंदणी पद्धतीनुसार, महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता खरेदीदारांना (Property Buyer) नोंदणीवेळी 6 टक्के शुल्क भरावे लागते. त्यापैकी 5 टक्के मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणून राज्य सरकारकडे जाते, तर 1 टक्का स्थानिक स्वराज्य संस्था उपकर संबंधित महानगरपालिकेकडे वर्ग केला जातो.



2025-26 मध्ये व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ


2024-25 या आर्थिक वर्षात नाशिकमध्ये अंदाजे 13,529 कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवहार झाले होते. त्याच्या तुलनेत 2025-26 मध्ये व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात (Real estate sector) मोठी तेजी आल्याचे दिसून येत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नियामक सुधारणांमुळे, बदलत्या गृहखरेदीच्या पसंतीमुळे आणि ताब्यात देण्यासाठी तयार असलेल्या घरांच्या उपलब्धतेमुळे या वाढीस चालना मिळाली आहे.


नियोजन तज्ज्ञांच्या मते, इमारतींची अनुमतीयोग्य उंची निश्चित करताना निश्चित मर्यादेपेक्षा अग्निसुरक्षा यंत्रणेच्या क्षमतेला प्राधान्य दिल्याने उंच इमारतींच्या (High rise buildings) प्रकल्पांना चालना मिळाली आहे. शहरातील उपलब्ध जमीन कमी होत असताना आणि जमिनीचे दर वाढत असताना, उभ्या दिशेने विकास हा अधिक व्यवहार्य पर्याय ठरत आहे.



नाशिकची ओळख अधिक मजबूत होणार


महापालिकेने (Nashik Municipal Corporation) आतापर्यंत 124 मीटर उंचीपर्यंतचे निवासी व व्यावसायिक प्रकल्प मंजूर केले असून, यामध्ये 40 पेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतींनाही परवानगी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अशा नव्या उंच इमारतींमुळे नाशिकचे बदलते स्कायलाइन स्पष्ट दिसत असून, महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहरी आणि रिअल इस्टेट केंद्र (Real Estate Center) म्हणून नाशिकची ओळख अधिक मजबूत होत आहे.

Comments
Add Comment

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Continental Tour Silver : भालाफेकीत रोहित यादवचा सुवर्णवेध; मुरली श्रीशंकरची ‘लांब उडी’, महिला १०० मीटरमध्ये भारताचा क्लीन स्वीप

भुवनेश्वर : भारताच्या अॅथलेटिक्सपटूंनी वर्ल्ड अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर लेव्हल स्पर्धेत दमदार

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये