आभाळमाता

जीवनगंध-पूनम राणे


 

जून महिन्याचा पहिला आठवडा. आभाळ भरून आले होते. आभाळात ढगांनी गर्दी केली होती. थंडगार वारा सुटला होता. उष्णतेने बेजार झालेल्या जनतेला हायसे वाटत होते.आकाशमातेने आपल्या बाळांना एकत्र करून आपले नेहमीचे काम करायला सांगितले होते; परंतु त्यातील एक बाळ ऐकायला तयार नव्हते. त्याला त्याच्या भावंडांबरोबर खाली जायचे नव्हते. आपल्या अंगाला माती लागेल म्हणून तो हट्ट करत होता. खाली उतरायला तयार नव्हता; परंतु आकाशमाता मोठी जिद्दीची होती. तिने इतर लेकरांसोबत त्यालाही ढकलून दिले. गडबड, लटपटत तो खाली आला.


जून महिन्यातील तो पहिला पाऊस. तापलेल्या धरित्रेला शांत करण्याचं काम आकाशमातेने आपल्या बाळांना दिले होते. सगळीकडे थंडावा जाणवत होता.आकाशमातेचे एक बाळ गडबड, लटपटत समुद्रात पोहोचले. मनात कुडत कुजबुजत कसे तरी इतर भावंडांबरोबर समुद्राच्या प्रवाहात वाहत होते. जोराची लाट आली आणि त्या बाळाला समुद्राच्या किनारी फेकण्यात आले. ते बाळ वाळूत रुतून बसले. जून महिन्यातील पहिला आठवडा. पहिला पाऊस म्हणून गंगा मातेचे पूजन करण्यासाठी अनेक भाविक समुद्रकिनारी आले. गंगा मातेला साडीचोळी, हिरव्या बांगड्या, फुले अर्पण केली. जमलेल्या जमावाने गंगा मातेला नमस्कार केला. हे सारे ते बाळ समुद्राच्या किनारी राहून पाहत होते. समुद्रकिनारी थंडगार हवा सुटली होती.


समुद्राच्या किनारी असणाऱ्या नारळाच्या झाडाच्या जावळ्या आनंदाने डोलत होत्या. एका वाऱ्याच्या झोताने नारळाच्या वृक्षानेही समुद्राला नारळ अर्पण केला होता. वाऱ्याची हलकीशी झुळुक मनाला उल्हासित करत होती. हे सारे दृश्य मातीत रुतून बसलेले ते आकाशमातेचे बाळ दुरून पाहत होते. मनात खूप दुःखी झाले होते. पुन्हा एकदा मोठी लाट आली आणि त्या बाळाला आपल्या भावंडांसोबत जाता आले.काही ठिकाणी शेतकऱ्यांची लगबग चालली होती. बी बियाणे नांगर, फावडे घेऊन शेतकरी शेतात चालले होते.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद ओसंडून वाहत होता. सारे जण आकाशमातेला धन्यवाद देत होते. पृथ्वीवरील दृश्य पाहून आकाशमातेला आभाळ ठेंगणे झाले होते.नियमितपणे आपल्याला जमेल ते काम करावे असा तिने आपल्या लेकरांना संदेश दिला होता आणि तिची लेकरे तो संदेश तंतोतंत पाळत होते. विहीर, तलाव, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत होते.सगळीकडे हिरवेगार दिसत होते. धरणी मातेने हिरवा शालू पांघरला होता. आकाशमातेला हे सारे दृश्य पाहून कृतार्थ वाटले. आपल्या लेकरांना तिने भरभरून आशीर्वाद दिला.

Comments
Add Comment

शहराचा विकास, माणसांची कोंडी

- संवाद; निशा वर्तक शहर वाढत आहे. उंच इमारती उभ्या राहत आहेत. रस्ते रुंद होत आहेत. मेट्रो, पूल, मॉल्स आणि आधुनिक

हम होंगे कामयाब...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कालच देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन देशभर आणि जगातील सर्व भारतीय वकिलातीत साजरा

बहीण-भावाचे नाते आयुष्यभर जपले!

- स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे रक्षाबंधन हा सण काळानुसार बदलला असला, तरी बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि अतूट नात्याचे

श्रावण मास

-  निमित्त; संध्या काटदरे बालकवींनी श्रावण मासाचे सुंदर वर्णन केले आहे - ‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे

आला श्रावण...

-प्रासंगिक; मंजिरी ढेरे श्रावणात प्रत्येकाच्या मनात निळा घन बरसत असतो. परंपरारक्षणाचा संदेश देणारा हा मास

मुलांनो, विचार बदला… भविष्य बदलेल !

- आनंदी पालकत्व; डॉ. स्वाती गानू मुलांनो, आयुष्यात बदल घडवायचा असेल, तर नेहमी परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात