पिंपरी : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. तब्बल ७२ तासांपासून सुरू असलेल्या शोध आणि बचाव मोहिमेदरम्यान शनिवारी आणखी काही मृतदेह बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून एकूण १७ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.शोधमोहीमेदरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी तपासणीनंतर सहा जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी) आणि रणजीत पाटील (वय २२, मोशी) यांचा समावेश आहे. (Pune Incident)
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत ...
दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि अन्य यंत्रणांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. दरम्यान १७ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी १४ जणांची सुटका पहिल्याच दिवशी करण्यात आली होती.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बचावकार्य अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते. संध्याकाळपर्यंत शोधमोहीम पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करत सर्व यंत्रणा घटनास्थळी कार्यरत होत्या.दरम्यान, शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. त्यांनी एनडीआरएफ, अग्निशमन दल, महापालिका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून शोधमोहीमेची सविस्तर माहिती घेतली. तसेच मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.बचावकार्यादरम्यान मोठ्या प्रमाणातील कचरा, अस्थिर स्लॅब, ढिगाऱ्याची सतत खचणारी स्थिती आणि विषारी वायू ही प्रमुख आव्हाने ठरत होते. घटनास्थळी विशेष पाडकाम यंत्रणा, एक्स्कॅव्हेटर आणि अत्याधुनिक मशिनरी तैनात करण्यात आली होती.मात्र या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर हादरले असून, बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध आणि दुर्घटनेमागील कारणांचा उलगडा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून, ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार ...
सुनेत्रा पवारांकडून मोशी दुर्घटनास्थळाची पाहणी
माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, मोशी कचरा डेपो येथे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कचऱ्यातून निर्माण होणारे विषारी वायू, अस्थिर ढिगारा आणि सततचा पाऊस यामुळे शोधमोहीमेत अडथळे निर्माण होत असले तरी प्रशासन आणि बचाव पथके पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्घटनेच्या चौकशीबाबत बोलताना त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मृतदेहांची योग्य ओळख पटवून ते नातेवाईकांच्या ताब्यात देताना प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत वाढत्या तापमानामुळे जागतिक स्तरावर ...
दुर्घटनेतील दोन मजले अनधिकृत
इमारत दुर्घटनेत दोन मजले अनधिकृत असल्याचे समोर आल्याने प्रशासकीय परवानगी केवळ एका मजल्याची असताना दोन बेकायदेशीर मजले उभारल्याचे उघड झाले आहे. या जीवघेण्या भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी भूमाफिया आणि दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. (Moshi Incidnet)






