Parth Pawar Engagement : पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची तारीख ठरली

२९ जुलै रोजी पुण्यात पार पडणार सोहळा; मैत्रीण कायनात धार हिच्यासोबत अडकणार विवाहबंधनात


मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत नेते अजित पवार(Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांचे सुपुत्र, खासदार पार्थ पवार(Parth Pawar) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या २९ जुलै रोजी पुण्यात एका फार्महाऊसवर पार्थ यांचा साखरपुडा समारंभ अत्यंत थाटामाटात पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ हे त्यांची दीर्घकाळाची मैत्रीण आणि व्यावसायिक कायनात धार हिच्यासोबत लग्नाच्या बोहल्यावर चढणार असून, या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबात लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत.



पार्थ पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळेचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या शाही विवाह सोहळ्यात पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत पारंपरिक पोशाखात उपस्थित असलेली तरुणी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. ती तरुणी म्हणजेच कायनात धार असून, ती लवकरच पवार कुटुंबाची सूनबाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कायनात ही एक नामांकित मॉडेल आणि यशस्वी व्यावसायिक आहे. ती मूळची काश्मीरची रहिवासी असून तिचे शालेय व उच्च शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले आहे. सध्या व्यावसायिक कारणांमुळे ती दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये वास्तव्यास असते. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी कायनात बारामती आणि मुंबईत झालेल्या शोकसभेलाही आवर्जून उपस्थित राहिली होती. काही महिन्यांपूर्वी पार्थ आणि कायनात हे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेताना दिसले होते आणि तेव्हापासूनच या दोघांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आले होते.



पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख युवा नेते असून, सध्या ते राज्यसभेत खासदारकी भूषवत आहेत. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवून पहिल्यांदा आपले राजकीय नशीब आजमावले होते; मात्र त्या निवडणुकीत त्यांना यश मिळू शकले नव्हते. आता खासदारकीची नवीन जबाबदारी सांभाळत असतानाच पार्थ पवार आपल्या आयुष्याची देखील नवी सुरुवात करणार आहेत.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर

Private Coaching Center : खासगी शिकवणी केंद्रांच्या नियमनासाठी कायद्याच्या प्रारूप मसुद्यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई : राज्यातील खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी स्वतंत्र कायदा करण्याच्या दृष्टीने शासनाने

Mega Block : रविवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; लोकल सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी येत्या रविवारी, दिनांक