Moshi accident : १ महिन्यापूर्वी नोकरी अन् अवघ्या महिन्यांपूर्वी थाटला होता संसार; मोशी दुर्घटनेने सावंत कुटुंबाचा आधार हिरावला!

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेतील बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू असून, शनिवारी ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. बचावकार्याला होत असलेल्या विलंबामुळे घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांच्या भावनांचा बांध फुटला असून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत १४ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी, अद्याप ७ कामगार आत अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र, या दुर्घटनेने सावंत कुटुंबावर कधीही न भरून येणारा आघात केला आहे. या कुटुंबाचा मुख्य आधार असलेला तरुण मुलगा, अक्षय सावंत याचा या ढिगाऱ्याखाली दबून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.



सुखी संसाराच्या स्वप्नांचा अवघ्या दोन महिन्यांत चुराडा


अक्षय सावंत हा अवघा ३३ वर्षांचा तरुण होता. नुकत्याच सुरू झालेल्या त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळत होती; अवघ्या एका महिन्यापूर्वीच तो या मोशी कचरा डेपोमध्ये नोकरीला लागला होता. विशेष म्हणजे, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याची लग्नगाठ बांधली गेली होती. नवी नोकरी आणि नवीन सहचारिणी यामुळे तो एका सुखी संसाराची सोनेरी स्वप्ने विणत होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ८ जुलै रोजी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे अक्षय कामावर गेला. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने पत्नीशी फोनवर संपर्क साधला आणि आपण जेवणासाठी जात असल्याचे सांगितले. पत्नीसोबतचे त्याचे हेच शेवटचे बोलणे ठरले; कारण त्यानंतर त्याचा फोन कायमचा बंद झाला.



आई ४ दिवस उपाशी; लेकाची वाट पाहतानाच ओढवला अनर्थ


पतीशी संपर्क होत नसल्याने घाबरलेल्या पत्नीने वारंवार फोन लावून पाहिला, मात्र तो बंदच लागत होता. मोबाईलचे लोकेशन मात्र मोशी कचरा डेपोच दाखवत होते. इकडे इमारत कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आपला अक्षय ढिगाऱ्याखाली अडकल्याचे समजताच त्याच्या आईने थेट घटनास्थळी धाव घेतली. सलग चार दिवस अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही न घेता ही माऊली तिथेच डोळ्यांत प्राण आणून बसली होती. 'माझा लेक सुखरूप बाहेर येईल' हीच एक भाबडी आशा तिला होती. प्रसारमाध्यमांशी बोलतानाही या आईने आपला मुलगा जिवंत असेल असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, ज्यावेळी ती लेकासाठी व्याकुळ होऊन वाट पाहत होती, तेव्हाच अक्षयने या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.



मदतीची घोषणा, पण कंपनीची उडवाउडवीची उत्तरे


या एका दुर्घटनेने एका आईच्या कुशीतला लेक हिरावून घेतला आणि लग्नाला दोन महिने पूर्ण होण्याआधीच एका नवविवाहितेचे कुंकू पुसले गेले. त्यांचे हे दुःख शब्दांत न मांडता येणारे आहे. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेनंतर संबंधित कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी आणि मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. मात्र, अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, कंपनीचे अध्यक्ष महेंद्र अनंतुला यांनी या भीषण दुर्घटनेला 'अॅक्ट ऑफ गॉड' (Act of God) म्हणजेच नैसर्गिक आपत्ती म्हटले आहे.

Comments
Add Comment

Amit Satam : 'जेन-झी' आणि 'जेन-नेक्स्ट' काँग्रेसला कधीही स्वीकारणार नाही!

- अमित साटम; देशविरोधी शक्तींकडून पैसे घेऊन अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव मुंबई : देशातील तरुण वर्ग अर्थात

Prithviraj Chavan : २०१४ मध्येच होता महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाची होती योजना मुंबई :

Hinjewadi Metro : पुणेकरांसाठी मोठी बातमी! माण-बालेवाडी मेट्रोला सुरक्षा मंजुरी; उद्घाटनाअभावी सेवा रखडली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pune) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या

Gold Silver Rate Today : बाईई...सोन्या-चांदीचा भडका! २४ तासांत दर उच्चांकी पातळीवर; पाहा आजचे ताजे भाव!

जळगाव : जळगावच्या (Jalgoan) स्थानिक सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत

Pune News : पुणे रेल्वे यार्डात 9 तासांचा मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून पुणे यार्डातील ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले

Beed News : पुण्यात खळबळ! बीडचा नामांकित राष्ट्रीय खो-खो खेळाडूची आत्महत्या; POCSO गुन्ह्यानंतर होता फरार

बीड : बीडचा राष्ट्रीय स्तरावरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची