Mumbai Best Bus Driver : भररस्त्यात बस थांबवून शेवपुरी खाण्याचा मोह पडला महागात; चालकाच्या व्हायरल व्हिडिओवर आता प्रशासनाची कारवाई

मुंबई : मुंबईतील बेस्ट (BEST) बस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी कारण अपघात नसून एका बस चालकाने शेवपुरी (Sev Puri) खाण्यासाठी भररस्त्यात बस थांबवल्याचा प्रकार आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली. यानंतर एका तरुणाने चालकाला जाब विचारला असता त्याच्याशी शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाल्यानंतर बेस्ट प्रशासनाने संबंधित चालकाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.


ही घटना मुंबईतील मुलुंड (Mulund) येथील एम.जी. रोड (M.G. Road) परिसरात घडली. माहितीनुसार, बस चालकाने ३० रुपयांची शेवपुरी खाण्यासाठी भररस्त्यात तब्बल २० मिनिटांपेक्षा अधिक काळ BEST बस उभी ठेवली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली.







या कोंडीत अडकलेल्या एका तरुणाने चालकाला याबाबत जाब विचारला. त्यावेळी चालकाने, "जा तुझ्या बापाला दाखव, आईला दाखव आणि पोलिसांनाही दाखव, मी कुणालाही घाबरत नाही," असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर बस चालकाने बस घेऊन तेथून निघून गेला. हा संपूर्ण प्रकार संबंधित तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.


या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत BEST प्रशासनाने मुलुंड आगार व्यवस्थापकाला संबंधित चालकाविरोधात योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बेस्टच्या जनसंपर्क अधिकारी सुचेता उतळे यांनी याबाबत माहिती दिली.


दरम्यान, मुंबईत बेस्ट बसच्या घटनांमुळे आधीच चर्चा सुरू असताना, आता केवळ ३० रुपयांच्या शेवपुरीसाठी भररस्त्यात बस थांबवल्याचा प्रकार समोर आल्याने प्रवासी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai University : विद्यार्थ्यांसाठी दिलासा! मुंबई विद्यापीठाच्या CDOE प्रवेशाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

मुंबई : मुंबई विद्यापीठाने आपल्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत (CDOE) चालवल्या जाणाऱ्या विविध पदवी आणि

Sanjay Rathod : मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, क्षेत्रीय स्तरावरील उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या कार्याला अभिवादन म्हणून २१ ऑगस्ट रोजी राज्यभर

Tehsildar Promotion : ५७ तहसीलदार उप जिल्हाधिकारी, तर २५ नायब तहसीलदार तहसीलदारपदी पदोन्नत

मुंबई : महसूल प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Cow Breed & Sheep Breed : महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान; उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

मुंबई : महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर 'माडग्याळ' प्रजातीच्या

AI smart goggles : 'एआय स्मार्ट गॉगल्स'च्या वापराबाबत येणार निर्बंध; राज्य सरकारचे'एसओपी' तयार करण्याचे निर्देश

सायबर विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती

Strict move by FDA : सुट्या खाद्यतेलाची विक्री बंद, 'एफडीए' चे १४ कलमी आदेश; तळलेल्या तेलाच्या पुनर्वापरावरही बंदी

मुंबई : नागरिकांच्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या खाद्यतेलाबाबत अन्न व औषध प्रशासनाने