BMC : मुंबईतील दुघर्टनांवर चर्चा, पण उबाठाचे रामाच्या नावाने राजकारण

सभागृहात मुंबईतील दुघर्टनांवर बोलण्याऐवजी रामाच्या नावाच्या घोषणा देत घातला गोंधळ


मुंबई : मुंबईत पावसाळ्यातील (Mumbai Rains) दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालिन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये उबाठाने (UBT) रामाच्या नावाने राजकारण करायला सुरुवात केली. आजवर रामाचे नाव न घेणाऱ्या उबाठाने सभागृहात आल्यापासून ते पुढे जय श्री राम... राम मंदिरकें चोरोंको, जुते मारो सालोंको अशा घोषणा देत मुंबईकरांच्या जिवनाशी निगडीत मुद्दयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील २५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या उबाठाने मुंबईचे वाट लावली असून त्यांना आता त्यावरही उपाययोजना सुचवण्यासाठी त्यावर राजकारण करण्यात अधिक स्वारस्य असल्याचे दिसून आले.



मुंबई महापालिकेत मनसे गटनेते यशवंत किल्लेदार, काँग्रेसचे अश्रफ आझमी, उबाठाच्या श्रध्दा जाधव आणि टी जगदिश यांच्या मागणीनुसार विशेष सभेचे आयोजन महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी केले होते. या विशेष सभेमध्ये उपस्थित राहिल्यानंतर उबाठाच्या नगरसेवकांनी जय श्री राम यांच्या नावाने घोषणा देण्यास सुुुरुवात केली. उबाठाच्या घोषणांनंतर भाजपच्या नगरसेवकांनीही जय श्री रामच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृहातील कामकाजाला वेगळेच वळण लागले. त्यामुळे या गोंधळात आयुक्तांच्या उपस्थित न राहण्याच्या मुद्दयावरून अधिक गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर महापालिका सभागृहात १० मिनिटाकरता सभा तहकूब करण्यात आले.


सभागृहात मुंबईत उद्भवणाऱ्या पावसाळ्यातील दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन केलेले असल्याने यावर सर्व सदस्यांकडून साधक बाधक चर्चा होणे आणि उपाययोजना सुचवणे आवश्यक होते. पण उबाठाने या विषयाला भलतीकडे वळवून हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला. उबाठाला मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत चिंता नसून त्यांना राजकारणात अधिक स्वारस्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. डोक्यावर भगव्या आणि पांढऱ्या टोप्या घालून त्यांनी रामाच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे उबाठाला जिथे या मुद्दयावर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची संधी होती, तिथे उबाठाने रामाच्या नावाचा गजर करत सत्ताधारी पक्षाला यांच्या चुका दाखवून उपायोजना काय करायच्या याची संधी हातची घालवून दिली.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका