Maharashtra Political News : आमदार बच्चू कडू यांच्याकडून मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंग

 सभापतींनी मागवला खुलासा; संगणक परिचालकांचा मुद्दा विधान परिषदेत गाजला


मुंबई (Mumbai): ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनावरून आणि खासगी कंपन्यांच्या पॅकेजबाबत सभागृहात वारंवार चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. या प्रकरणात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे(Ram Shinde) यांनी संबंधित विभागाकडून तातडीने लेखी खुलासा मागवला आहे.



आमदार बच्चू कडू आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात यंदाच्या विधिमंडळ अधिवेशनात संगणक परिचालकांच्या पगारवाढीच्या मुद्द्यावरून जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला असताना, 'संगणक परिचालक दरमहा ५० हजार रुपये कमावतात आणि त्यांना कमिशन म्हणून पगार दिला जातो,' अशी माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहाला दिली होती. मात्र, कडू यांनी हा दावा त्याच वेळी फेटाळून लावत, हे अत्यंत चुकीचे आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षामध्ये संगणक परिचालकांचा पगार संबंधित ग्रामपंचायतींमार्फत केला जातो, असे सांगत कडू यांनी मंत्र्यांवर सभागृहाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला आहे.



आमदार बच्चू कडू आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय संघर्ष विधानसभा निवडणुकीपासून उफाळून आल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत कडू यांनी गोरे यांच्या माण-खटाव मतदारसंघातून आपला उमेदवार देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता विधिमंडळात संगणक परिचालकांच्या प्रश्नावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कडू यांचा पारा चांगलाच चढला होता. "मंत्री जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांनी केलेला ५० हजार रुपये मानधनाचा दावा जर खोटा ठरला, तर मी माझी मिशी काढून टाकेन," असे खुले आव्हानच बच्चू कडू यांनी सभागृहात दिले. हा वाद येथेच न थांबता आता हक्कभंग प्रस्तावापर्यंत पोहोचला आहे.



सभापतींकडून विभागाला निर्देश

या संपूर्ण वादळी चर्चेनंतर आमदार कडू यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. "या हक्कभंग प्रस्तावाच्या अनुषंगाने संबंधित ग्रामविकास विभागाकडे अधिकृत खुलासा मागवण्यात आला आहे. विभागाकडून सविस्तर खुलासा प्राप्त झाल्यानंतरच या प्रस्तावावर पुढील निर्णय घेतला जाईल," अशी माहिती सभापतींनी सभागृहाला दिली. त्यामुळे आता या प्रकरणी ग्रामविकास मंत्रालय काय खुलासा सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण विभागाने

BMC Students ISRO Visit : मुंबई महापालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना ISRO, सिंगापूर किंवा जपानचा अभ्यास दौरा; आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि

Mulund Dumping Ground : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे ढिग तसेच!

- पुन्हा कंपनीला वाढवून दिला एप्रिल २०२७ पर्यंत कालावधी मुंबई (सचिन धानजी) मुलुंड डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवून

BMC News : मुंबई महापालिका भाडेपट्ट्याने दिलेल्या जागा देणार मालकी हक्काने जागा

- शासनाच्या धर्तीवर धोरण बनवण्याचा ठराव मंजूर मुंबई ( विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर, बृहन्मुंबई

BMC Parks Photography : महापालिकेची उद्याने आता छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून विकसित; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील प्रमुख सार्वजनिक उद्याने व बागांमध्ये

Mumbai Smart Turf Policy : मुंबईत महापालिकेद्वारे 'अॅडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण?

- खेलो मुंबई' ॲपद्वारेच होणार बुकिंग आणि विषारी रबर कणांवर येणार बंदी. - भाजप नगरसेवक ताजिंदरसिंग तिवाना यांची