Nashik : 'हे सर्व आरोप हास्यास्पद', 'ऑपरेशन टायगर'वर शिवसेनेतील नेत्याचं मोठं विधान

Nashik :राज्यात झालेल्या 'ऑपरेशन टायगर' प्रमाणेच नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) आणि नगरसेवकांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाच्या 15 नगरसेवकांनी एकत्र येत, 5 कोटी रुपयांच्या निधीचे आमिष दाखवून 'एजंट' माध्यमातून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेवर केला होता. या आरोपांना आता शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.



अजय बोरस्ते काय म्हणाले ?


अजय बोरस्ते (Ajay Boraste) म्हणाले की, "हे सर्व आरोप आरोप हास्यास्पद आहे, यातून त्याच्या पक्षातील अस्वस्थता समोर येत आहे. आमच्यावर जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. कोण एजंट आहे, कोण आमची वकिली करतो हे आम्हालाही कळू द्या, आम्ही शोध घेऊ. आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या कामांकडे बघून कोणीही आले तर सांगता येत नाही. आमच्यावर आरोप करून त्यांची अस्वस्थता बाहेर येत आहे. राज्यभरात प्रवेश होत आहे, त्यात नाशिकमध्ये काही प्रवेश झाले तर आश्चर्य वाटायला नको. उबाठाच्या लोकांनी गोकुळ गिते यांना मतदान केले, आता त्यांच्या माध्यमातून काही झाले तर माहिती नाही. एकनाथ शिंदे शब्द पाळणारे नेते आहेत, त्यांच्याकडे घोडेबाजार चालत नाहीत. गोकुळ गिते यांनी यांना उबाठाने मतदान केले ते आता शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, त्यामुळे कुच्छ भी हो सकता है," असे त्यांनी म्हटले आहे

Comments
Add Comment

Ritu Tawde : मुंबईच्या महापौरांनी केली जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी; स्वच्छता मोहिमेचा प्रत्यक्ष घेतला आढावा

मुंबई : उंच लाटांमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या कचऱ्याबाबत वारंवार नागरी तक्रारी

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Assistant Engineer accepting a bribe : मुंबई महापालिकेत खळबळ; २० हजारांची लाच घेताना 'अ' वॉर्डचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

MUMBAI : मुंबई महानगरपालिकेत (BMC) भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे.

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान