Eknath Shinde - Sharad Pawar : शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात घेतली आमदारांची बैठक

- कॅबिनेट सोडून शिंदे पवारांच्या भेटीला; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, रोहित पवार गैरहजर


मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, बुधवारी विधान भवनात एक मोठी राजकीय घडामोडी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षातील आमदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात घेतली. विशेष म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाची (कॅबिनेट) बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री शिंदे ती बैठक अर्धवट सोडून शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला, तरी या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Eknath Shinde - Sharad Pawar)



महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या समितीचे सदस्य म्हणून खा. शरद पवार विधानभवनात उपस्थित होते. सीमा प्रश्नाबाबतच्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील हजर होते. या बैठकीत शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना अत्यंत महत्त्वाच्या राजकीय विषयांवर मार्गदर्शन केल्याचे समजते. मात्र, या बैठकीला आमदार रोहित पवार गैरहजर राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. रोहित यांची अनुपस्थिती आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात झालेली ही बैठक यामुळे आगामी काळात राज्यात नवे राजकीय समीकरण आकारास येणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. (Eknath Shinde - Sharad Pawar)



तर्कवितर्कांना उधाण :


पवारांच्या पक्षाची बैठक सुरू असताना दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती. सर्व मंत्री या बैठकीत व्यस्त असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक कॅबिनेटची बैठक सोडून शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. तेथे त्यांनी शरद पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांच्यात काही वेळ चर्चा झाली. ही चर्चा आटोपल्यानंतर शिंदे पुन्हा कॅबिनेटच्या बैठकीसाठी रवाना झाले. यावरून देखील राजकीय तर्क लढवले जात आहेत. (Eknath Shinde - Sharad Pawar)




Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; महाराष्ट्र शासनाच्या नियमांत महत्त्वाचा बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Donald Trump : भारताकडून शिका!’ ट्रम्प यांचा अमेरिकेच्या निवडणूक व्यवस्थेवर निशाणा; SAVE Act साठी दबाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा SAVE America Act मंजूर करण्यासाठी काँग्रेसवर

Philippines News : धक्कादायक! फिलीपिन्समधील शाळेत गोळीबार; 2 जण जखमी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

फिलीपिन्स : फिलीपिन्समध्ये शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण फिलीपिन्समधील झांबोआंगा