Amit Satam : विधान भवनाच्या पायऱ्यांवरील कॅमेऱ्यांना आवरा; अमित साटम यांची मागणी

- मृत्यूवर हसलो नाही, दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओची चौकशी करा


मुंबई : विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना, अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करत भाजप आमदार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी विधानसभेत केली. "मी कोणत्याही मृत्यूच्या घटनेवर हसलो नाही. माध्यमांनी संभाषणातील काही सेकंदांचा भाग एडिट करून दाखवल्यामुळे समाजात चुकीचा संदेश गेला आहे," असे सांगत साटम यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांसमोर चित्रिकरण करणाऱ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यांवर नियंत्रण आणण्याची आग्रही मागणी सभागृहात केली.



सभागृहात या विषयाकडे लक्ष वेधताना अमित साटम (Amit Satam) म्हणाले की, अधिवेशन कालावधीत विधानभवनाच्या पायऱ्यांसमोर माध्यमांचे कॅमेरे २४ तास लावलेले असतात. मागील आठवड्यात आपण माध्यमांशी बोलत उभे असताना तेथून ज्येष्ठ आमदार जयंत पाटील जात होते. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये एका पूर्णपणे वेगळ्याच विषयावर हलक्या-फुलक्या स्वरूपात चर्चा झाली आणि त्यानंतर जयंत पाटील तेथून निघून गेले. मात्र, त्यानंतर एका वाहिनीने आमच्यातील संभाषणाचा मूळ संदर्भ बाजूला ठेवून केवळ काही सेकंदांचा भाग दाखवला. यामुळे आपण एखाद्याच्या मृत्यूवर हसत असल्याचा अत्यंत चुकीचा आणि क्लेशदायक आभास निर्माण करण्यात आला. मी मृत्यूवर हसलो नाही, हे स्वतः जयंत पाटील यांनाही चांगल्या प्रकारे माहिती आहे. आमच्यातील संभाषण संपूर्ण वेगळ्या विषयावर होते, मात्र त्याचा सोयीस्कर तुकडा दाखवून समाजात माझी नाहक बदनामी करण्यात आली, असा संताप त्यांनी व्यक्त केला.



उद्या २८८ सदस्यांपैकी कोणासोबतही असे घडू शकते!


या घटनेकडे वैयक्तिक प्रकरण म्हणून न पाहता लोकशाही संस्थांच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे साटम यांनी नमूद केले. आज ही दुर्दैवी घटना माझ्यासोबत घडली आहे; मात्र अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांचे चुकीचे एडिटिंग होत राहिले, तर उद्या विधानसभेतील २८८ सदस्यांपैकी कोणत्याही सदस्यासोबत असाच प्रकार घडू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अशा दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंवर तातडीने नियंत्रण ठेवण्यासाठी आणि माध्यमांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सभागृहाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी अमित साटम (Amit Satam) यांनी शेवटी केली.

Comments
Add Comment

Ghatkopar School : घाटकोपर येथील टिळकमार्ग महानगरपालिका शाळा इमारत झाली खुली

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका एन विभागांतर्गत घाटकोपर (पूर्व) येथे टिळकमार्ग येथे नव्याने

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)