Madhuri Misal : ग्लोबल हॉस्पिटलचा अतिरिक्त FSI परत घेण्याबाबत कायदेशीर चाचपणी; विधान परिषदेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे उत्तर!

- २० वर्षे गरीब रुग्णांना खाटा न दिल्याचा मुद्दा गाजला; २१ जुलैच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर शासन कडक पावले उचलणार


मुंबई : "मुंबईतील 'ग्लोबल हॉस्पिटल'ने गेल्या २० वर्षांत गरीब रुग्णांना हक्काच्या खाटा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. या रुग्णालयाला मंजूर केलेला ७,२३२ चौ. मीटरचा अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) २१ जुलैच्या न्यायालयीन निर्णयानंतर विधी विभागाचा (Legal Department) सल्ला घेऊन परत घेता येऊ शकतो का, याची कायदेशीर चाचपणी करून शासन पुढील कडक कारवाई करेल," असे ठाम आणि सकारात्मक उत्तर आज राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी विधानपरिषदेत दिले. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना (UBT) आमदार ॲड. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्यमंत्री मिसाळ यांनी शासनाची ही भक्कम आणि कायदेशीर बाजू सभागृहात मांडली.


">आमदार ॲड. अनिल परब यांनी, "ग्लोबल हॉस्पिटलला पालिकेकडून विविध सवलती मिळूनही ते नियमानुसार १५% खाटा गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात का देत नाही आणि या प्रकरणी शासन काय ठोस भूमिका घेणार?" असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ (Madhuri Misal) यांनी स्पष्ट केले की, रुग्णालय प्रशासनाने वारंवार नोटीस देऊनही न्यायालयाचा आसरा घेतला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, रुग्णालय प्रतिनिधींनी पालिकेशी संपर्क साधून २१ जुलैपूर्वी खाटा देण्याची तयारी दर्शवली असली, तरीही त्यांचा पूर्वेतिहास लक्षात घेऊन शासन कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील पावले उचलणार आहे.



तसेच भाजप आमदार परिणय फुके यांनी मुंबईतील इतर मोठ्या कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना होणाऱ्या त्रासाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आणि खाटा उपलब्धतेची माहिती देणारे डॅशबोर्ड लावण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी सांगितले की, सर्व धर्मादाय रुग्णालयांना डॅशबोर्ड लावणे बंधनकारक केले असून, ज्यांनी ते लावले नाहीत त्यांच्यावर धर्मादाय आयुक्तांमार्फत चौकशी करून पुढील पावले उचलली जातील.


याच चर्चेदरम्यान विरोधी सदस्यांनी खाजगी रुग्णालयांच्या अनागोंदी कारभारावर कडक कारवाईची मागणी लावून धरली होती. यावर उत्तर देताना प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात स्पष्ट केले की, "काही खाजगी रुग्णालयांमध्ये डॅशबोर्ड न लावणे किंवा गरीब रुग्णांना योग्य सुविधा न देणे अशा त्रुटी आढळल्या आहेत. या मनमानीला आळा घालण्यासाठी महापालिका क्षेत्रातील आयुक्तांना आणि ग्रामीण भागातील जिल्हाधिकाऱ्यांना आजच सुधारित व अत्यंत कडक सक्तीचे आदेश दिले जातील." तसेच धर्मादाय रुग्णालयांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर दोन लोकप्रतिनिधी, चॅरिटी कमिशनर आणि अप्पर जिल्हाधिकारी (Additional Collector) यांची समिती आधीच अस्तित्वात असून, सर्व आमदारांनी आपापल्या जिल्ह्यात या समितीच्या नियमित बैठका घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.



न्यायालयात 'विशेष सरकारी वकील' नेमणार : 


याच वेळी सभागृहात चंद्रकांत रघुवंशी यांनी रुग्णालयांच्या अवाजवी बिलांचा आणि नोटीस देऊनही रुग्णालय प्रशासन कोर्टातून स्थगिती (स्टे) आणत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. यावर आमदारांच्या चिंतेची दखल घेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, "रुग्णांची आर्थिक लूट करून रुग्णालय प्रशासन न्यायालयाचा आसरा घेते ही वस्तुस्थिती आहे. यापुढे अशा सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयातील बाजू भक्कम करण्यासाठी शासन गरज भासल्यास 'विशेष सरकारी वकील' (Special Public Prosecutor) नियुक्त करेल." यासोबतच, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ विशेष मोहीम (Drive) राबवून ज्या ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी किंवा नियमांचे उल्लंघन आढळेल, तिथे तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश आजच दिले जातील, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.


Tags
Maharashtra politicsMaharashtra newsMadhuri MisalMaharashtra Monsoon Session 2026
Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे