Powai Lake crocodile : पवई तलावाजवळील रहिवासी भागात मगर शिरली; वन विभागाच्या पथकाकडून सुखरूप रेस्क्यू

मुंबई : पवई तलावालगतच्या मोरारजी नगर परिसरात मंगळवारी सुमारे सात फूट लांबीची मगर ( Powai Lake crocodile)आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दर्ग्याजवळ मगर दिसताच स्थानिकांनी तातडीने वन विभागाला माहिती दिली. (Mumbai News)



माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. संयुक्त मोहिमेद्वारे मगरीला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे पकडण्यात आले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या मगरीची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून तिची प्रकृती स्थिर आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. (Forest Department)





पावसाळ्यात तलाव आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने वन्य प्राणी अधूनमधून मानवी वस्त्यांमध्ये येण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी आणि प्राण्यापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 
Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे