Maharashtra rain update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम; पालघर, रायगडला रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Rain)


कोकण विभागात पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. (IMD Alert)



पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.


उत्तर महाराष्ट्रात नाशिक घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतील नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सखल भागांमध्ये सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


विदर्भात अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



मराठवाड्यात सध्या कोणताही विशेष अलर्ट नसला तरी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. काही भागांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मुंबईत खासगी कार्यालयांना शक्य असल्यास 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या