Badge for Ola-Uber drivers : ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना १ ऑगस्टपासून 'बॅच' बंधनकारक

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; बाईक टॅक्सीला प्रतिदिन ५ रुपये आणि प्रतिराईड २ टक्के कर आकारणार


मुंबई : राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी, तसेच ओला व उबर सारख्या ॲग्रीगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारने १ ऑगस्ट २०२६ पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी महाराष्ट्र अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र (बॅच) (Badge for Ola-Uber drivers) असणे अत्यंत बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय, या क्षेत्राचे नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात, या उद्देशाने यापुढे बाईक टॅक्सी बाहेर काढताना प्रतिदिन ५ रुपये महसूल, तर प्रत्येक राईडमागे २ टक्के 'वेलफेअर टॅक्स' (कल्याणकारी निधी) आकारला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी मंगळवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात केली.


चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप लांडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) बोलत होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात सध्या सुमारे ४ ते साडेचार लाख अवैध बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून, या माध्यमातून शासनाला एक रुपयाचाही महसूल मिळत नसल्याची कबुली त्यांनी दिली. सुरुवातीला मंत्रिमंडळाने केवळ प्रदूषणमुक्त 'ईव्ही' (इलेक्ट्रिक) बाईक टॅक्सीला परवानगी दिली होती. ओला, उबर आणि रॅपिडो या कंपन्यांना ३० दिवसांचा तात्पुरता परवाना देण्यात आला होता; मात्र बहुतांश कंपन्यांनी अटींचे उल्लंघन करत सरसकट पेट्रोल आधारित बाईक रस्त्यावर आणल्या, ज्यांच्यावर आरटीओने सातत्याने दंडात्मक कारवाई केली आहे. (Badge for Ola-Uber drivers)



नव्या नियमावलीनुसार, राज्यात वाहनचालन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळवण्यासाठी व बाईक टॅक्सी चालवण्यासाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य केले जाईल, जेणेकरून राज्यातील स्थानिक तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल. या नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला असून, जुलै अखेरीस मंजुरी मिळून १ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. या अंतर्गत, महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक चालकाकडे सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचा 'बॅज' असणे बंधनकारक असेल आणि हा बॅज देण्यापूर्वी पोलीस विभागामार्फत संबंधित चालकाची चारित्र्य पडताळणी (पोलीस व्हेरिफिकेशन) केली जाणार आहे. (Badge for Ola-Uber drivers)



स्वीगी-झोमॅटो चालकांवर कारवाई करणार :


या चर्चेत उबाठा गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी अन्नपदार्थ घरपोच डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटोच्या दुचाकीस्वारांचा प्रश्न उपस्थित केला. हे डिलिव्हरी बॉईज अनेकदा वेगाचे नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे वाहने चालवत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी मान्य केले की, या कंपन्यांच्या गाड्यांना ताशी २५ किमीची वेग मर्यादा निश्चित केलेली असतानाही ते नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे भविष्यात अशा बेदरकार दुचाकीस्वारांवरही आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या वायुवेग पथकांमार्फत कठोर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट केले. (Badge for Ola-Uber drivers)



काय कारवाई केली?


">परिवहन विभागाने अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा रोखण्यासाठी घेतलेल्या भूमिकेची आकडेवारी सांगताना मंत्री (Minister Pratap Sarnaik) म्हणाले की, एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ८१४ दोषी वाहने आढळून आली; त्यापैकी १५१ वाहने जप्त करून १४ एफआयआर दाखल करण्यात आले आणि १६.२५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर एप्रिल २०२६ ते मे २०२६ या दोन महिन्यांच्या काळात २११ दोषी वाहनांवर कारवाई करत ६६ वाहने जप्त करून २.३१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. या क्षेत्रात प्रवाशांची सुरक्षा, चालकांचे नियमन, सरकारी महसुलात वाढ आणि स्थानिक युवकांना कायदेशीर रोजगार या चारही बाबी साध्य करण्यासाठी शासन सर्वंकष धोरण राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Badge for Ola-Uber drivers)

Tags
taxi driveruberpratap sarnaikOlaMaharashtra newsMaharashtra Monsoon Session 2026Badge mandatoryfrom August 12026
Comments
Add Comment

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या