TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना भिवंडी न्यायालयाने १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (TET Exam Paper Leak)


यापूर्वी न्यायालयाने या चारही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी आरोपींना भिवंडी येथील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. (TET Exam Paper Leak)



या प्रकरणातील आरोपींमध्ये हरियाणातील धीरज बलराज सिंग, बिहारमधील राजीव शॉ, आकाशकुमार स्वराजकुमार तसेच या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या बिजेंदर कुमार गुप्ता याची पत्नी सुमनकुमारी गुप्ता यांचा समावेश आहे. (TET Exam Paper Leak)


टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या गैरप्रकाराचा तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे, मोबाईल फोन आणि डिजिटल पुराव्यांचीही तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (TET Exam Paper Leak)



या बहुचर्चित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा