मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन, ...
याचबरोबर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सरकारी कार्यालयांचे कामकाज अर्धा दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज आणि पावसाची तीव्रता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. (SDMA advisory Mumbai)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ...
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय प्रवास करू नये, तसेच हवामान आणि वाहतुकीसंदर्भातील अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. (Heavy Rain Alert)
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वाहतुकीचा वेग मंदावल्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागांमध्ये जनजीवनही विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार पुढील सूचना जारी केल्या जाणार आहेत.