Nashik Rain Update : नाशिकमध्ये पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीसांचे सतर्क राहण्याचे आवाहन

Nashik Rain Update : राज्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासासाठी रेड अलर्ट जारी केला. नाशिक जिल्ह्यात पुढील ४८ तासांत ढगफुटीसदृश मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, काही ठिकाणी ३०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या नाशिकच्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.



मुख्यमंत्री फडणवीसांकडून आपत्तीव्यवस्थान कक्षाला भेट


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून आपत्तीव्यवस्थान कक्षाला भेट देण्यात आली आहे. यादरम्यान त्यांनी सर्व पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, अतिवृष्टी सुरू आहे. काही भागांमध्ये पुरपरिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात वारा सुरू आहे. त्यामध्ये दरड कोसळत आहे. यासंदर्भात जो आपत्तीव्यवस्थापन कक्ष आहे. याठिकाणी राज्यातील सर्व प्रमुख अधिकारी आहेत. (Nashik Rain Update)



उद्या नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता


यावेळी त्यांनी नाशिकबाबत देखील भाष्य केले आहे. ते म्हणाली की, उद्याचा नाशिकला अलर्ट आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे उद्या त्या भागात 300 एमएमचा पाऊस पडू शकतो. उद्या तिथे प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत, उपाययोजना करत आहोत. 8 तारखेपर्यंत सातत्याने हे सगळे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. (Nashik Rain Update)



राज्यात 8 तारखेपर्यंत अलर्ट


मुंबईकडे येणारी एक लेन सुरू आहे आणि पुण्याकडे येणारी एक लेन सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत आणि पाणी साचले आहे. ज्यावेळी 70 च्या वेगाने वारे वाहिल, त्यावेळी वेगवेगळ्या संभावणा आहेत. महिनाभर जितका पाऊस पडतो तो पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईत झालाय. राज्यात 8 तारखेपर्यंत अलर्ट आहे. काल दिवसभरात 350 झाडे पडली. अशी माहितीही त्यांनी दिली.



अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली


पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, कोल्हापुरातही धोक्याची घंटा आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती असणार आहे. इंद्रायणी नदीचे सगळे पूल पाण्याखाली जातायत. वारकऱ्यानी देखील काळजी घेतली पाहिजे. वारकऱ्यानी देहू आणि आळंदी परिसरात न जाता थेट पुण्याचे येण्याचे आवाहन. लोकांना आपण अलर्ट करत आहोत लोकानी काळजी घेण्याची गरज आहे.



संध्याकाळी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेऊ


उद्यासाठी संध्याकाळी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेऊ. खाजगी कार्यालयाच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुट्टीचा निर्णय कार्यालयानी घेण्याची गरज आहे. हा मानवता धर्म आहे तो पाळला जाईल अशी अपेक्षा असते. मेट्रो, रेल्वे पूर्णपणे ठप्प झालेल्या नाहीत काही अडचणी येत आहेत पण सेवा देण्याचे काम सुरू आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा