Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट! सियाच्या घरातून तिचा जुना मोबाईल जप्त; 'कोडवर्ड' चॅट्स आणि ...

- पोलिसांच्या तपासाला वेग


पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या (Ketan Agarwal Murder Case) तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) यांनी गुन्ह्याच्या कटादरम्यान मोबाईलवर सांकेतिक भाषा आणि टोपणनावांचा वापर केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने दोघांच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले असून, या चॅटमधील कोडवर्डचा अर्थ उलगडण्याचे काम सध्या सुरू आहे.



न्यायालयात पोलिसांचा महत्त्वाचा दावा :


दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींनी मोबाईलमधील महत्त्वाचे चॅट्स डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायबर तपासाद्वाChetan Chaudhariरे हे चॅट्स पुन्हा मिळवण्यात आले आहेत. या संभाषणांमध्ये अनेक ठिकाणी सांकेतिक शब्द आणि टोपणनावांचा वापर करण्यात आल्याने त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावत दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. (Ketan Agarwal Murder Case)



सियाच्या घरातून वर्षभर जुना मोबाईल जप्त :


तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून तिचा एक वर्ष जुना मोबाईल फोन जप्त केला आहे. या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता असल्याने त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, सिया आणि चेतन यांची पहिली भेट एका दिवाळी पार्टीत झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर कथित प्रेमसंबंधात झाले आणि त्याच कालावधीत संपूर्ण कट रचला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत. (Ketan Agarwal Murder Case)



'कोडवर्ड' उलगडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान :


रिकव्हर करण्यात आलेल्या चॅट्समध्ये वापरण्यात आलेले सांकेतिक शब्द तपासातील महत्त्वाचा धागा मानले जात आहेत. हे कोडवर्ड नेमके कोणत्या व्यक्ती, ठिकाण किंवा हत्येच्या नियोजनाशी संबंधित आहेत, याचा उलगडा करण्यासाठी सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. (Ketan Agarwal Murder Case)



या प्रकरणात डिजिटल पुरावे, सांकेतिक चॅट्स आणि जप्त करण्यात आलेला जुना मोबाईल हे तपासाचे महत्त्वाचे दुवे ठरत असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Ketan Agarwal Murder Case)

Comments
Add Comment

Narayan Rane : मुंबई-गोवा महामार्गाचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

सिंधुदुर्गात ४६ कोटींचे 'सबमरीन टुरिझम' प्रोजेक्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार खासदार नारायण राणे यांचा

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या