FIFA world Cup 2026 : फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या राऊंड ऑफ १६ चे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या मेस्सी-रोनाल्डो कधी उतरणार मैदानात?

अमेरिका: फिफा विश्वचषक २०२६ आता आपल्या अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. काल पार पडलेल्या 'राऊंड ऑफ ३२'च्या अटीतटीच्या सामन्यांनंतर स्पर्धेतील सर्वोत्तम १६ संघ आता बाद फेरीसाठी सज्ज झाले आहेत. ४ जुलै ते ८ जुलै दरम्यान हे हाय-व्होल्टेज सामने उत्तर अमेरिकेतील विविध शहरांमध्ये खेळवले जातील. आज (४ जुलै) ला राऊंड ऑफ १६ चा पहिला सामना कॅनडा विरुद्ध मोरक्को यांच्यात खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात तिन्ही यजमान देश कॅनडा, अमेरिका आणि मोक्सिको यांनी राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे .







'राऊंड ऑफ १६' चे संपूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळेनुसार):


कॅनडा विरुद्ध मोरोक्को ४ जुलै, रात्री १०:३० वाजता, ह्यूस्टन स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


पॅराग्वे विरुद्ध फ्रान्स ५ जुलै, पहाटे २:३० वाजता, फिलाडेल्फिया स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


ब्राझील विरुद्ध नॉर्वे ६ जुलै, पहाटे १:३० वाजता, न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


मेक्सिको विरुद्ध इंग्लंड ६ जुलै, पहाटे ५:३० वाजता, मेक्सिको सिटी स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


पोर्तुगाल विरुद्ध स्पेन ७ जुलै, रात्री १२:३० वाजता, डॅलस स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


अमेरिका विरुद्ध बेल्जियम ७ जुलै, पहाटे ५:३० वाजता, सिएटल स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त ७ जुलै, रात्री ९:३० वाजता, अटलांटा स्टेडियम (भारतीय वेळेनुसार)


स्वित्झर्लंड विरुद्ध कोलंबिया ८ जुलै, पहाटे १:३० वाजता, बीसी प्लेस, व्हॅन्कुव्हर (भारतीय वेळेनुसार)







भारतात सामने कुठे पाहता येतील ?


फिफा वर्ल्ड कप २०२६ राऊंड ऑफ १६ चे सर्व सामने भारतात युनायटेड ८ स्पोर्ट्स २ (SD/HD) या टीव्ही चॅनेल्सवर पाहता येतील. तसेच Zee5 वर सबस्क्रिप्शनसह सर्व सामने लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.




सर्वाधिक गोल (Top Scorers)गोल्डन बूटच्या शर्यतीत सध्या अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे:


१.लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना): ७ गोल


२.किलियन एम्बाप्पे (फ्रान्स): ६ गोल (सोबत २ असिस्ट)


३.अर्लिंग हालांड (नॉर्वे): ५ गोल


४.हॅरी केन (इंग्लंड): ५ गोल


५.विनीशियस ज्युनियर (ब्राझील): ४ गोल


६.ओस्मान डेम्बेले (फ्रान्स): ४ गोल




Comments
Add Comment

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात

Sourav Ganguly : क्रिकेटच्या ‘दादा’च्या कुटुंबावर संकट? गांगुली दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ म्हणून प्रसिद्ध असलेला सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि त्याची