- मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल; 'राजकीय धर्मांतर' झालेल्यांनी हिंदू धर्माविषयी बोलू नये
मुंबई : "राम मंदिराच्या निधीवर भाजपने दरोडा टाकल्याचा आरोप करत 'रामरक्षा' आंदोलनाची नौटंकी करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा प्रभू श्रीराम आणि हिंदू धर्माशी काहीही संबंध राहिलेला नाही. त्यांचे पूर्णपणे 'राजकीय धर्मांतर' झाले असून, पाकिस्तानात बसलेल्या आपल्या अब्बांना खूश करण्यासाठीच ते राम मंदिर आणि हिंदू राष्ट्राची बदनामी करत आहेत," अशा जहाल शब्दांत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उबाठाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. "ज्यांनी मुख्यमंत्री असताना अजान स्पर्धा भरवल्या आणि हिंदू सणांवर बंदी घातली, त्या 'उद्धव उल-हक' यांनी आता हिंदू धर्माविषयी बोलू नये," असा टोलाही त्यांनी लगावला. (Nitesh Rane)
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानपेटी आणि देणगी निधीच्या कथित अपहाराचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. या लुटीचा जाब विचारण्यासाठी येत्या रविवारी दादर येथील हनुमान मंदिराजवळ भव्य 'रामरक्षा' आंदोलन करण्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विधान भवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. नितेश राणे म्हणाले, "मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा उबाठा गट आता राम मंदिराच्या निमित्ताने राजकारण करत आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना मुंबईत अजान स्पर्धा घेणारे हे 'उद्धव उल-हक' आता मंदिरांमध्ये जाऊन महाआरती करण्याची भाषा करत आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी हिंदूंच्या सणांना आणि मंदिरांना कुलूप लावले, पण मशिदी किंवा ईदच्या सणांना तसे नियम लावण्याची हिंमत त्यांनी कधी दाखवली नाही. हा हिंदूंची आणि हिंदू राष्ट्राची बदनामी करण्यासाठी पाकिस्तानकडून घेतलेल्या सुपाऱ्यांचा भाग आहे. हा भगवंताच्या नावाखाली आणला जाणारा जिहाद असून, हिंदू समाज अशा पद्धतीची असंख्य इस्लामिक आक्रमणे आतापर्यंत हाणून पाडत आला आहे. अशा ढोंगी आणि बहरूपी माणसाने आमची पवित्र मंदिरे भ्रष्ट करू नयेत, म्हणूनच उद्धव ठाकरे ज्या ज्या मंदिरात पाऊल टाकतील, तिथे गोमूत्र शिंपडून ते मंदिर शुद्ध करावे लागेल", असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.
मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा; फ्लेवर पानांच्या नावाखाली अंमली पदार्थ विक्रीचीही चौकशी होणार मुंबई : शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुणांच्या ...
राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय, निवडणुकीचा नाही!
उद्धव ठाकरे यांच्या 'ऑपरेशन राम मंदिर' या आरोपाचा समाचार घेताना राणे म्हणाले, "भारतीय जनता पक्षाच्या जन्माच्या आधीपासून आम्ही हिंदू आहोत. आमच्या हृदयातून राम कसा काढणार? जसे त्यांच्या मनातून आता अल्लाह काढता येणार नाही, तसेच आमच्या मनातून राम काढणे अशक्य आहे. आमच्यासाठी राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नसून आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे. उद्धव ठाकरेंची भाषा आणि एखाद्या दहशतवाद्याची भाषा यात काहीच फरक राहिलेला नाही. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावर उबाठाचे खासदार निवडून आले, तेव्हा हे लोक फटाके फोडायचे. मग आताच यांना भाजपविरोधात बोलण्याची बुद्धी का सुचली? सत्तेचा गैरवापर कसा करावा, यात उद्धव ठाकरेंनी 'पीएचडी' केली आहे. स्वतः मुख्यमंत्री असताना आमचे घर पाडणे, देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे षड्यंत्र रचणे, हेच काम त्यांनी केले. पालघरमध्ये साधूंची निर्घृण हत्या झाली, तेव्हा हेच मुख्यमंत्री होते. मग तेव्हा त्यांना हिंदुत्वाची आठवण का आली नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शुक्रवारी मंत्र्यांच्या अनुपस्थिवरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ ...
...तर ठाकरेंची 'घरवापसी' मीच करीन!
संजय राऊत यांनी 'भाजपने राम मंदिराला अंडरवर्ल्ड बनवले' या केलेल्या विधानावर बोलताना, "राऊत यांचे विधान कोणीही गांभीर्याने घेत नाही. 'सामना' वृत्तपत्रातून त्यांचा पगार आणि भविष्यातील पेन्शन चालू राहावी, यासाठीच त्यांची ही धडपड सुरू आहे," अशी मिश्किल टिप्पणी राणे यांनी केली. तसेच, 'अमित शाह किंवा भाजप सोबत आले तरी आपण अयोध्येला जाऊ' या ठाकरेंच्या विधानावर उत्तर देताना राणे म्हणाले, "एक हिंदू म्हणून आम्ही आमची पदे आणि पक्षाची ओळख मंदिराच्या बाहेर ठेवून आत प्रवेश करतो. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असो की अन्य कोणी, मंदिरात जाण्यास कोणालाही बंदी नाही. उद्या जर उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत मंदिरात यायचे असेल, तर मी स्वतः त्यांना घेऊन जाईन. कदाचित त्यांचे पुन्हा शुद्धीकरण करून मी त्यांची 'घरवापसी'च करून टाकीन," असा टोला नितेश राणे यांनी लगावला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात स्वतः 'ऑपरेशन भाजप' राबवून पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांनी आता मराठी माणसाच्या आणि मराठी पंतप्रधानाच्या अस्मितेच्या बाता मारू नयेत, असे सांगत राणे यांनी ठाकरेंच्या आरोपांना जहाल शब्दांत प्रत्युत्तर दिले.






