हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे. जनजातीय जिल्हा किन्नौरमध्ये चोलिंग परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या माती, दगड आणि चिखलामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.5 पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला असून अनेक वाहने रस्त्यात अडकली आहेत.



पुराचा वेग इतका प्रचंड होता की महामार्गावरून जाणारी अनेक वाहने चिखल आणि ढिगाऱ्यात अडकून पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित आहेत.घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचाव आणि मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले. किन्नौरचे उपायुक्त डॉ. अमित कुमार शर्मा यांनी घटनेची पुष्टी करत महामार्गावरील मलबा हटवण्यासाठी आणि अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी जड यंत्रसामग्री तैनात करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासनाचे पथक घटनास्थळी कार्यरत असून राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



दरम्यान, लाहौल-स्पीती जिल्ह्यातील जाहलमा नाल्यात आलेल्या पुरामुळे पूल पुन्हा एकदा बाधित झाला आहे. सीमारेषा रस्ते संघटनेने (BRO) उभारलेली तात्पुरती पुलियाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने उदयपूर उपविभागासह पांगी खोऱ्याचा संपर्क तुटला आहे.या परिस्थितीत उदयपूर उपविभागातील शेनूर गावातील शांती देवी यांना छातीत संसर्ग आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कुल्लू येथे उपचारासाठी हलविण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिका (Ambulance) जाहलमा नाल्याजवळ पोहोचल्यावर नाला दुथडी भरून वाहत होता. अशावेळी बीआरओ आणि पोलिस जवानांनी बँको लोडरच्या सहाय्याने स्ट्रेचरसह रुग्णाला सुरक्षितपणे नाला पार करून दुसऱ्या बाजूला पोहोचवले. त्यानंतर त्यांना कुल्लू येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.



बीआरओने नाल्यावर तात्पुरता पूल उभारून वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. मे महिन्यात भूस्खलनामुळे जाहलमा पूल नुकसानग्रस्त झाला होता. सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून महिनाअखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती स्थानिक आमदार अनुराधा राणा यांनी दिली.

Comments
Add Comment

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रगीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी

Justice Yashwant Varma : न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध; संसदेत चौकशी समितीचा अहवाल सादर

नवी दिल्ली: न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी जळित नोटांची बंडले सापडल्याप्रकरणी वादात सापडलेले माजी

Karnataka Bandh : कावेरी पाणीवाटपाच्या विरोधात कर्नाटक बंद; जाणून घ्या काय सुरू, काय राहणार बंद?

बंगळुरू : कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (CWMA) १२ ऑगस्टपासून पुढील १५ दिवस तमिळनाडूला दररोज १२ हजार क्युसेक

Ladakh Earthquake : लडाखमध्ये पहाटेच भूकंपाचा जोरदार धक्का! लेहमध्ये ५.५ रिश्टर स्केलचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट

लेह : लडाखमधील लेह शहराला गुरुवारी पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. सकाळी सुमारे ६ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचे

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं