Sassoon Dock : फिनलँडच्या कंपन्यांच्या सहकार्याने होणार ससून डॉकचे आधुनिकीकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री नितेश राणे यांच्यात बैठक

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकचे (Sassoon Dock) डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण करून त्याला जागतिक दर्जाचे व पर्यावरणपूरक मत्स्य बंदर बनवण्याच्या कामाला आता गती मिळणार आहे. या संदर्भात फिनलंडच्या कंपन्यांच्या मदतीने राबवल्या जाणाऱ्या आधुनिकीकरण प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विधानभवनातील दालनात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे ससून डॉकचा कायापालट होणार आहे.



या विशेष बैठकीत ससून डॉकच्या आधुनिकीकरणासोबतच इतरही अनेक प्रलंबित आणि तांत्रिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीदरम्यान ससून डॉक परिसरातील 'बीपीटी'च्या (मुंबई पोर्ट ट्रस्ट) अखत्यारीतील गोडाऊनसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या परिसराचा योग्य वापर करून आधुनिकीकरण प्रकल्पाला गती देण्याबाबत या वेळी नियोजन करण्यात आले. फिनलंडच्या कंपन्यांचे सहकार्य घेऊन या संपूर्ण परिसराचे डिजिटायझेशन करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून बंदराचा विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.



या महत्त्वपूर्ण बैठकीला मत्स्यआयुक्त तथा महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता