PF Interest Credit : पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर! आजपासून व्याज जमा; जाणून घ्या संपूर्ण गणित

मुंबई : देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees' Provident Fund Organisation - (EPFO)) आजपासून आर्थिक वर्ष २०२५-२६ चे पीएफ (Provident Fund -(PF)) व्याज सदस्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करणार आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील १५ दिवसांत सुमारे ७.५ कोटी ईपीएफ (EPF) सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होईल. यंदा केंद्र सरकारने ८.२५ टक्के वार्षिक व्याजदर (Interest Rate) मंजूर केला आहे.



१० लाख रुपयांवर ८२,५०० रुपये व्याज मिळेल का?


अनेकांचा समज असा असतो की, ३१ मार्च २०२६ रोजी पीएफ खात्यात १० लाख रुपये असतील तर त्यावर थेट ८२,५०० रुपये व्याज मिळेल. मात्र, ही गणना अचूक नाही. ईपीएफओ (EPFO) व्याजाची गणना वर्षअखेरीच्या एकूण शिल्लकीवर करत नाही. ती दर महिन्याच्या अखेरच्या शिल्लकीवर (Monthly Closing Balance) केली जाते आणि संपूर्ण व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात जमा केले जाते.



पीएफ (PF) व्याजाची गणना कशी केली जाते?


वार्षिक व्याजदर : ८.२५ टक्के


मासिक व्याजदर : ८.२५ ÷ १२ = ०.६८७५ टक्के


प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या शिल्लकीवर व्याजाची गणना केली जाते.


संपूर्ण व्याज ३१ मार्च रोजी खात्यात जमा केले जाते.



दरमहा १०,००० रुपये पीएफमध्ये जमा केल्यास किती व्याज मिळेल?


समजा, एखाद्या कर्मचाऱ्याने १ एप्रिल २०२५ पासून दरमहा १०,००० रुपये पीएफमध्ये जमा केले. वर्षभरात त्याची एकूण ठेव १,२०,००० रुपये होईल.


या ठेवीवर मिळणारे एकूण व्याज सुमारे ५,३६२.५० रुपये असेल.



त्यामुळे वर्षअखेरीस खात्यातील एकूण रक्कम:


मूळ ठेव : १,२०,००० रुपये


व्याज : ५,३६२.५० रुपये


एकूण शिल्लक : १,२५,३६२.५० रुपये


हीच रक्कम पुढील आर्थिक वर्षासाठी सुरुवातीची शिल्लक मानली जाईल.



१० लाख रुपयांवर प्रत्यक्षात किती व्याज मिळेल?


समजा, ३१ मार्च २०२५ रोजी तुमच्या पीएफ खात्यात ८,८०,००० रुपये आहेत आणि पुढील वर्षभरात दरमहा १०,००० रुपये जमा करून एकूण १,२०,००० रुपये भरले जातात. अशा परिस्थितीत ३१ मार्च २०२६ रोजी खात्यातील एकूण रक्कम १० लाख रुपये होते.


मात्र, व्याज दरमहा वाढणाऱ्या शिल्लकीवर मोजले जात असल्याने तुम्हाला ८२,५०० रुपये नव्हे, तर सुमारे ७७,९६२.५० रुपये व्याज मिळेल.


यानंतर खात्यातील एकूण रक्कम १०,७७,९६२.५० रुपये होईल.


पीएफ (PF) व्याजाची रक्कम तुमच्या खात्यातील अंतिम शिल्लकीवर एकदाच मोजली जात नाही. दर महिन्याच्या अखेरच्या शिल्लकीवर व्याजाची गणना करून ते आर्थिक वर्षाच्या शेवटी एकरकमी जमा केले जाते. त्यामुळे वर्षभरातील योगदान (Contribution) आणि शिल्लक यानुसार प्रत्येक सदस्याला मिळणारी व्याजाची रक्कम वेगवेगळी असू शकते.

Comments
Add Comment

Kalpana Kharat : भोंदू खरातची पत्नी कल्पना खरात अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर

Kalpana Kharat : मोठी बातमी समोर आली आहे. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातने अखेर शिर्डी पोलिस ठाण्यात (Shirdi Police Station) हजेरी

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

Vinod Tawde : “संसदेचा ६१ टक्के वेळ वाया गेला; याला राहुल गांधी जबाबदार” विनोद तावडेंची टीका

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार म्हणून आपले हे पहिले संसदीय अधिवेशन असल्याचे सांगत भाजप नेते विनोद तावडे यांनी

Nilesh Rane : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकण वासियांसाठी १२ सप्टेंबरला दादर ते कुडाळ मोफत विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था

आमदार निलेश राणे यांचा सालाबाद प्रमाणे उपक्रम मालवण : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या

Bharat Gogawale : रायगडचा पालकमंत्री दोन दिवसांत जाहीर होईल – भरत गोगावले

- ध्वजारोहणाची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : गेल्या दीड

Nashik : सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४६ सराईत गुन्हेगार हद्दपार

Nashik : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी सराईत व