आमदार निलेश राणे यांचा विधानसभेत आरोप; वाढीव बिलांबाबत ग्रामीण जनतेमध्ये तीव्र असंतोष
मुंबई : "स्मार्ट मीटरबाबत केवळ चार टक्के तक्रारी आल्याचे सांगत अधिकारी ऊर्जा राज्यमंत्र्यांना खोटी माहिती (ब्रीफिंग) देत आहेत. प्रत्यक्षात ग्रामीण भागात या मीटरविरोधात ५० टक्क्यांहून अधिक तक्रारी असून, जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, कोणत्याही क्षणी ग्रामीण भागातील संतप्त जनतेकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मार खाण्याची वेळ येईल," असे कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.(Nilesh Rane)
मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमिततेचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुकारलेल्या 'रामरक्षा आंदोलना'वर आणि ...
विधानसभेत स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव बिलांबाबत आमदार भिमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधीच्या चर्चेवर ते बोलत होते. निलेश राणे म्हणाले, "माझा मतदारसंघ हा पूर्णपणे ग्रामीण भागात येतो आणि सध्या प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट मीटरवरून मोठा संघर्ष सुरू आहे. अधिकारी मंत्रालयात बसलेल्या मंत्र्यांना सांगत आहेत की तक्रारीच नाहीत, पण हे धादांत खोटे आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागात महावितरणचे अधिकारी दुरुस्तीच्या नावाखाली ग्राहकांच्या घरी जातात आणि ग्राहकाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तिथे चोरट्या मार्गाने स्मार्ट मीटर बसवून मोकळे होतात. या मीटरमुळे बिलांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. आज ग्रामीण भागात तुम्ही नुसती शासकीय गाडी जरी घेऊन गेलात, तरी स्मार्ट मीटर विरोधात तक्रारी करणाऱ्या लोकांचे घोळके रस्त्यावर पाहायला मिळतील. माझ्या एकट्या मतदारसंघातून मी शेकडो तक्रारी आत्ता आणून देऊ शकतो. या वाढत्या जनक्षोभाचे निवारण करण्यासाठी सरकार नक्की काय उपाययोजना करणार आहे?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(Nilesh Rane)
मंत्री उदय सामंत यांची घोषणा; भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती मुंबई : राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या ...
आमदार नाना पटोले यांनीही निलेश राणे यांच्या सुरात सूर मिसळत खासगी कंत्राटदारांच्या मुजोरीवर बोट ठेवले. "मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर करताना स्मार्ट मीटर हे ऐच्छिक असतील असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे मीटर अनिवार्य केले जात आहेत. मीटर बदलल्या क्षणापासून गरिबांची वीजबिले दुपटी-तिपटीने वाढत आहेत," असा आरोप पटोले यांनी केला.
ठाकरे गटाने २५ वर्षांत एका तरी कंत्राटदारावर कारवाई केलीय का?; भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात मुंबई : ठाकरे गटाने त्यांच्या २५ वर्षांच्या मुंबई ...
तक्रारींचे प्रमाण नगण्य - राज्यमंत्री मेघना बोर्डिक
आमदार निलेश राणे आणि इतर सदस्यांच्या आरोपांना उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, "स्मार्ट मीटरमुळे बिल वाढते हा एक अपप्रचार आणि गैरसमज आहे. केंद्रीय विद्युत अधिनियम २००३ नुसार ही प्रक्रिया राबवली जात असून राज्यात आतापर्यंत १ कोटी २३ लाख पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवले आहेत. एकूण २ कोटी ग्राहकांपैकी केवळ ३ लाख तक्रारी आल्या असून हे प्रमाण नगण्य आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच, पुणे परिमंडळात जून २०२६ पर्यंत सुमारे ९ लाख ८४ हजार मीटर बसवले असून प्राप्त झालेल्या ११ हजार ४१७ तक्रारींपैकी ४ हजार प्रकरणांची 'चेक मीटर' लावून प्रत्यक्ष जागेवर तपासणी केली असता केवळ ४ मीटरमध्ये तांत्रिक त्रुटी निघाल्याचा दावा मंत्र्यांनी केला. ग्राहकांच्या तक्रारींसाठी 'कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट' पोर्टल उपलब्ध असून वर्षभरात वीजपुरवठा आणि बिलिंग संदर्भातील ५३ लाख तक्रारींचे तात्काळ निवारण केल्याचे मंत्र्यांनी सांगितले.(Nilesh Rane)






