- झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत तुफानी खेळी; सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला
मुंबई : भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत त्याने केवळ संघाला दमदार सुरुवात करून दिली नाही, तर सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनण्याचा ऐतिहासिक पराक्रमही आपल्या नावावर केला. (IND vs ZIM 1st T20)
१५ वर्षांतच जागतिक विक्रम :
वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) १५ वर्षे ११८ दिवस वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या कुशल मल्ला यांच्या नावावर होता. त्यांनी १५ वर्षे ३४० दिवस वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते. वैभवने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढत इतिहास रचला. (IND vs ZIM 1st T20)
- ९ ते १३ जून २०२७ दरम्यान लंडनमध्ये होणार अंतिम लढत; ऑस्ट्रेलिया अव्वल, भारत पाचव्या स्थानावर मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) २०२५-२७ ...
टी-२० क्रिकेटमधील दोन विक्रमही केले नामोहरम :
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम यापूर्वी जिब्राल्टरच्या लुईस ब्रूस (१६ वर्षे ५६ दिवस) यांच्या नावावर होता. तसेच आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमध्ये हा विक्रम अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझ (१७ वर्षे २९६ दिवस) यांच्या नावावर होता. वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) या दोन्ही विक्रमांवर मात करत नवा इतिहास घडवला. (IND vs ZIM 1st T20)
T20I मध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारे फलंदाज :
- वैभव सूर्यवंशी (भारत) : १५ वर्षे ११८ दिवस विरुद्ध झिम्बाब्वेविरुद्ध, हरारे (२०२६) - लुईस ब्रूस (जिब्राल्टर) : १६ वर्षे ५६ दिवस विरुद्ध माल्टा, अल्बेर्गारिया (२०२१) - काविन चड्ढा (इंडोनेशिया) : १६ वर्षे ७६ दिवस विरुद्ध स्वीडन, बाली (२०२६) - अलुसिने तुरे (सिएरा लिओन) : १६ वर्षे ८९ दिवस विरुद्ध घाना, बेनोनी (२०२३) - तेनझिन राबगे (भूतान) : १६ वर्षे ११८ दिवस विरुद्ध चीन, क्वालालंपूर (२०२३) (IND vs ZIM 1st T20)
- भारताने पहिल्या टी-२० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा घेतला निर्णय; युवा वेगवान गोलंदाज अशोक शर्माला मिळाली संधी मुंबई : भारत आणि ...
वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi) ही तुफानी खेळी भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत आशादायी मानली जात आहे. इतक्या लहान वयात जागतिक विक्रम करत त्याने भविष्यातील सुपरस्टार असल्याचे संकेत दिले असून, क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (IND vs ZIM 1st T20)




