Ketan-Siya Case : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग; सिया गोयलचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधातील तपासाला पुणे ग्रामीण पोलिसांनी वेग दिला आहे. तपासाच्या अनुषंगाने गुरुवारी सिया गोयलला विविध ठिकाणी नेऊन पंचनामे करण्यात आले. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.(Siya Goyal)





दरम्यान, दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत असल्याने त्यांना पुढे न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचे पुत्र केतन अगरवाल यांचा १८ जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलला मार्केट यार्ड परिसरातील 'लीलाकुंज' येथील तिच्या निवासस्थानी नेऊन पंचनामा केला. त्यानंतर लुल्लानगरमधील फाखरी हिल्स आणि एरिया-३७ परिसरातही घटनासंदर्भातील पाहणी करण्यात आली. यावेळी घटनेच्या दिवशी सिया गोयलने परिधान केलेले कपडे पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील घटनाक्रम, पुरावे आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून, न्यायालयातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Siya Goyal).




Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण