Rain deaths : मुसळधार पावसात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, गेल्या काही दिवसांत विविध दुर्घटनांमध्ये ६ जणांचा बळी गेला आहे. पावसाच्या जोडीला प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.



जोगेश्वरी पूर्व(Jogeshwari East) येथील गोमती वैशाली चाळीत शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. या आगीमुळे पसरलेल्या विषारी धुरामुळे ७५ वर्षीय सलीम तडवी आणि ६७ वर्षीय मुमताज तडवी या ज्येष्ठ दांपत्याचा गुदमरून मृत्यू झाला. तर मुंब्रा येथील कौसा परिसरात साचलेल्या पावसाच्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने १७ वर्षीय आलिया मोहम्मद साजिद चांदीवाला या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीज वितरण कंपनीच्या असुरक्षित वायरमुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथे खेळत असताना दोन वर्षीय सोहम लखन कसबे हा चिमुकला सांडपाणी प्रकल्पाच्या उघड्या खड्ड्यात पडून मरण पावला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे खड्डे विनाबॅरिकेड्स उघडे ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा-भाईंदरमध्ये(Mira bhaydar) मंगळवारी झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या राहुल अशोक पाटील (३२) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राहुलचे वडील माजी उपनगराध्यक्ष असून, शहरातील धोकादायक झाडांच्या छाटणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बदलापूर येथील जांभळे गावात कल्याणमधील ५० वर्षीय अरुणा कुलकर्णी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. २८ जून रोजी टिटवाळा येथून दर्शन करून परतताना 'गुगल मॅप(Google Map)'ने दाखवलेल्या अपूर्ण आणि धोकादायक उरण बंदर-बडोदे महामार्गावरून जात असताना, पुलावरील मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. हा मार्ग वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला नसतानाही तो जीपीएसवर दिसत असल्याने अनेक चालक बळी पडत आहेत.



तत्पुर्वी साकीनाका भागात दुरुस्तीच्या कामासाठी उघडे ठेवलेल्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला असून, विधानसभा अध्यक्षांनी दोषींवर 'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या घटनेत, चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता नवीन दुर्घटनांची मालिका सुरू आहे.


मुंबईसह राज्यभरात एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासन आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. "मुंबईकरांचे किती बळी घेणार?" असा सवाल करत विरोधी पक्षांनी प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले आहे. अनेक ठिकाणी नाले दुरुस्तीचे काम, रस्त्यावरील खड्डे आणि विद्युत उपकरणांची देखभाल योग्यरित्या न झाल्याने हे मृत्यू ओढवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.



भारतीय हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांमध्ये पुढील २४ तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून, दादर, सायनसह अनेक सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चितीची मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक