Uday Samant : समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करणार

- मंत्री उदय सामंत यांची घोषणा; सर्व परवानग्या पूर्ण, मुंबईकरांची पाणीचिंता मिटणार


मुंबई : मुंबईची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन मनोरी येथे उभारण्यात येणारा २०० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा खारे पाणी गोडे करण्याचा (नि:क्षारीकरण) महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. "या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या सर्व पर्यावरणीय परवानग्या प्राप्त झाल्या असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांची पाणीटंचाईची चिंता कायमची मिटण्यास मोठी मदत होईल," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री सामंत यांनी मुंबईतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सभागृहाच्या पटलावर ठेवला. या चर्चेत भाजप आमदार योगेश सागर यांनीही उपप्रश्न उपस्थित करून प्रशासकीय गतीबाबत विचारणा केली. मंत्री उदय सामंत म्हणाले, "सध्या मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी अशा विविध सात धरणांमधून मुंबईला दररोज सुमारे ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सद्यस्थितीत मुंबई शहराची एकूण दैनंदिन गरज ४ हजार ६६५ दशलक्ष लिटर इतकी आहे. म्हणजेच मुंबईला दररोज सुमारे ५६५ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भासत आहे. ही वाढती तूट भरून काढण्यासाठीच मनोरीचा नि:क्षारीकरण प्रकल्प अत्यंत गेमचेन्जर ठरणार आहे."


हा प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्त्वावर (जेव्ही) विकसित केला जात असून, यासाठी 'मे. जीव्हीपीआर इंजिनियर्स लिमिटेड' आणि 'मे. आय.डी.ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड' यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या बांधकामाची एकूण किंमत ४ हजार ७७ कोटी रुपये निश्चित करण्यात आली असून, यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कार्यादेशानुसार (वर्क ऑर्डर) प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने (४ वर्षे) असून, त्यानंतर पुढील २० वर्षांसाठी या प्रकल्पाचा प्रचलन व परिचालन (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) कालावधी निश्चित करण्यात आला आहे.



१ हजार लिटर पाण्यासाठी ३५ ते ४४ रुपये खर्च


या प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) संदर्भातील सर्व आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्या आहेत. प्रकल्प पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर, समुद्रकिनाऱ्यावरील खारे पाणी प्रक्रिया करून पिण्यायोग्य करण्यासाठी प्रति १ हजार लिटर मागे अंदाजे ३५ ते ४४ रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच प्रति लिटर १५ ते १७ पैसे इतक्या माफक दरात मुंबईकरांना हे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Comments
Add Comment

Zeeshan Siddique : ‘तुला जिवंत सोडणार नाही’; NCP नेते झीशान सिद्दीकींना जीवे मारण्याची धमकी, फरार गँगस्टरकडून ऑडिओ मेसेज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण