Chembur tree collapse : झाड दुघर्टनाप्रकरणी दोन रस्ते अभियंत्यांवरील निलंबन कारवाईमुळे अभियंते नाराज

महापालिकेतील अभियंत्यांच्या संघटनेने निलंबन मागे घेण्याची केली मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चेंबूर येथील झाड दुघर्टनेनंतर रस्ते विभागाच्या दोन अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून तातडीने निलंबित करण्यात आल्यानंतर महापालिकेतील अभियंत्यांची संघटना अॅक्शन मोडवर आली आहे. या अभियंत्यांकडून खुलासा मागून न घेता निलंबित केल्यामुळे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यातच मॅनहोलमधील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणीही सहायक आयुक्तांसह चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आल्याने मुंबईतील सर्वच कामगार संघटनांनी एकत्र येत प्रशासना विरोधात कामबंद आंदोलन पुकारण्याच्या हालचाली सुरु केल्याचे बोलले जात आहे.



मुंबईतील सलग दोन दुघर्टनांमध्ये एका सहायक आयुक्तांसह सहा अभियंते आणि एका वृक्ष अधिकारी यांना निलंबित केले. या निलंबन कारवाईनंतर अभियंत्यांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आयुक्तांची भेट होवू शकली नाही. मात्र, चेंबूर येथील झाड दुघर्टनेनंतर रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंता यांना तात्काळ निलंबित केल्यानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने आयुक्तांना पत्र लिहून ही नाराजी व्यक्त करत त्या दोन्ही रस्ते अभियंत्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मागील पावसाळयापूर्वी कॉक्रीट रस्त्याचे कामाची देखभाल करणा-या पालिका अभियंत्यांना जबाबदार ठरवून त्यांच्या कडून कोणताही खुलासा न मागवता निलंबन करण्यात आले,याबाबत ही नाराजी व्यक्त केली. या पत्रांत असे नमुद केले आहे की, जोरदार हवा, मुळांनी माती सोडणे, मुळांचे कुजणे, झाडाचे अतिरिक्त वजन अथवा अयोग्य छाटणी अशा बार्बीमुळे मुसळधार पावसात झाडे पडतात. तसेच झाड धोकादायक झाले आहे की नाही त्याबाबत वृक्ष संगोपन तज्ञ (आरबोरिस्ट) सांगू शकतात. तसेच विषयाधिन झाड हे पिंपळाचे होते व ते खोडामधून उन्मळून पडले. त्यामूळे या दुर्देवी घटनेला पालिका अभियंत्यांना जबाबदार धरणे अनाकलनीय आहे,असे म्हटले आहे.



चेंबूर येथील रोड क्र. ११ वरील कॉक्रीटीकरणाचे काम झाडाच्या बुंध्यापासून २.५०मी पेक्षा जास्त अंतरावर करण्यात आले आहे व हे काम पूर्ण झाल्यानंतर मे ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रचंड पाऊस मुंबईत झाला आहे. त्यामुळे याची पुर्ण चौकशी केल्याशिवाय व अशा दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून तज्ञांचा अहवाल येईपर्यंत पालिका अभियंते अरूण मुंडे (दुय्यम अभियंता) आणि योगेश पार्टे (सहाय्यक अभियंता) यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी,अशी विंनती केली आहे.

Comments
Add Comment

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता

New AC Local : २०२९-३० पर्यंत मुंबईच्या सर्व लोकल एसी होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; द्वितीय श्रेणीचे तिकीट वाढवणार नाही मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचे

GeM : जेमच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची दुहेरी बाजी; पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव

मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार

One-day Seminar : ‘पडद्यावरचा सिनेमा, पडद्यामागचं गणित’ या विषयावर रंगणार एकदिवसीय परिसंवाद

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या