Tree Fall in Santacruz : सांताक्रुझमध्ये झाड पडून ८ जण जखमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू तसेच चार विद्यार्थी जखमी झाल्यानंतर गुरुवारी सांताक्रुझ पश्चिम येथे रहेजा कॉलेज शेजारी एका खासगी इमारतीच्या आवारातील झाड पडून ८ जण जखमी झाले आहे. विशेष म्हणजे हे झाडांची छाटणी करण्यासाठी आलेले कर्मचारी पाहणी करत असताना बाजूचे झाड कोसळून हे सर्व त्यात जखमी झाले.



मुंबईत दिवसात शहरात १३ झाडे पडण्याच्या घटना घडल्या. त्याबरोबरच पूर्व उपनगरात २२ व पश्चिम उपनगरात ५६ अशा एकूण ९१ ठिकाणी झाडे/फांदया पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये सांताक्रुझ पश्चिम येथील झाड दुघर्टनेचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता सुमारास रिलीफ रोड, रहेजा कॉलेज शेजारी, सांताक्रूझ (प) येथे खाजगी इमारतीच्या आवारात पडलेल्या झाडाची पहाणी करण्याकरिता तेथील कर्मचारी गेले असता बाजूचे झाड त्यांच्यावर कोसळले. या घटनेत ८ लोक जखमी झाले. या ८ लोकांना उपचारार्थ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये नूर आलम (पुरुष / २६ वर्षे), राजेश कुडाळकर - (पुरुष / ५१ वर्षे), विनय कदम (पुरुष / ३८ वर्षे), सुलेमान शेख - (पुरुष / २८ वर्षे), विनोद भट (पुरुष / ४६ वर्षे), देवर्षी सिंह - (पुरुष / २८ वर्षे), जगदीश निकम - (पुरुष / २८ वर्षे)] निलाद तुळे (पुरुष / ६७ वर्षे,) आहेत.



जून महिन्याच्या सुरुवातील खार लिंकिंग रोडवरील एसआरए प्रकल्पांतर्गत जागेतील एक झाड कोसळून दोन मुली जखमी झाल्या होत्या. त्यातील एका मुलींचा मृत्यू झाला आणि दुसरीवर अद्यापही उपचार सुरु आहे. त्यानंतर बुधवारी चेंबूर येथील युनिव्हर्सल शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड पडून एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, तर चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामुळे झाड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होवून जिवितांचे नुकसान होत असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर