Asha Bhosle : राज्यात स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार - आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्रातील गायन-संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले (Asha Bhosle) संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar News) यांनी गुरुवारी विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली.


मंत्री शेलार म्हणाले, महाराष्ट्राला संगीत, नाट्य, साहित्य, चित्रपट, लोककला आणि विविध सांस्कृतिक क्षेत्रांची समृद्ध परंपरा लाभली असून भारतीय संगीताच्या विकासात राज्यातील अनेक नामवंत कलाकारांचे मोलाचे योगदान आहे. या कलाकारांमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. (Asha Bhosle Lifetime Achievement Award)



आशा भोसले या भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर आणि असाधारण व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ विविध भारतीय भाषांमध्ये गायन करत संगीत क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. विशेषतः मराठीतील बालगीते, भावगीते, चित्रपटगीते, गझल, लावणी आणि लोकसंगीताला त्यांनी आपल्या आवाजाने समृद्ध केले आहे. त्यांच्या गायकीमुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असून त्यांची कार्यनिष्ठा, सातत्य आणि उत्कृष्टता अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.


या पुरस्काराअंतर्गत गायन-संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांचा गौरव करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये रोख, शाल आणि सन्मानचिन्ह असे राहणार आहे. पुरस्कारासाठी पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आणि पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी गायन-संगीत क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री ॲड. शेलार यांनी दिली.



हा पुरस्कार दरवर्षी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ८ सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, असेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Driving Licence Rules : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्सचे कडक नियम लागू!

- ड्रायव्हिंग लायसन्स काढताय? हे नवीन नियम नक्की पाहा! मुंबई : तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात ड्रायव्हिंग

Devendra Fadnavis : उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ'

मुंबई(Mumbai) : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ

Ashadhi Wari Special Train : आषाढी वारीसाठी रेल्वेची मोठी भेट! CSMT–मिरज दरम्यान आणखी २ विशेष 'वन-वे' गाड्या; २३ जुलैपासून आरक्षण सुरू

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ४४ हजार कोटींच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ची अंमलबजावणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार मुंबई(Mumbai) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Railone App : पश्चिम रेल्वेचे प्रवाशांना 'रेलवन' अॅप वापरण्याचे आवाहन

मुंबई : रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, स्मार्ट आणि डिजिटल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांना