Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर आक्षेपार्ह पोस्ट; महिला डॉक्टर ५ वर्षांसाठी निलंबित

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder) प्रकरणावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशातील महिला डॉक्टर डॉ. मुस्कान सोनी (Dr. uskan Soni) यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 'ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन' (AIDSA) ने त्यांना मध्य प्रदेश शाखेच्या खजिनदार पदावरून तात्काळ हटवले असून पुढील पाच वर्षांसाठी त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही निलंबित केले आहे.


नेमकं काय घडलं ?


डॉ. मुस्कान यांनी इन्स्टाग्रामवर केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याचा आरोप आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मृत केतन अग्रवाल यांच्या शारीरिक रूपावरही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच #IHateMen हा हॅशटॅग वापरल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. (Siya Goyal)

वाद वाढल्यानंतर डॉ. मुस्कान यांनी व्हिडिओद्वारे सार्वजनिक माफी मागितली आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, AIDSAच्या शिस्तपालन समितीने ही माफी नाकारत त्यांच्या वक्तव्याला वैद्यकीय व्यवसायाच्या आचारसंहितेविरोधातील आणि समाजात द्वेष पसरवणारे असल्याचे नमूद केले.



संघटनेने जारी केलेल्या आदेशात डॉक्टरांनी समाजात संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान ठेवणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करत, अशा प्रकारची विचारसरणी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

दिवसेंदिवस केतन अग्रवाल प्रकरणात नवे ट्विस्ट समोर येत आहे. सियाच्या वकिलाने त्याच्या भावाला १० कोटींची नोटीस पाठवली आहे. या घटना आता कोणते वळण घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी