Kiran Sarnaik : अपक्ष आमदार किरण सरनाईक आता शिवसेनेचे सहयोगी सदस्य

शिंदेंचे विधान परिषदेतील बळ वाढले; विदर्भातील राजकीय समीकरणांवर होणार परिणाम



मुंबई : विरोधकांना एकामागून एक धक्के देत सत्ताधारी शिवसेनेने विधान परिषदेत पुन्हा एकदा आपली ताकद वाढवली आहे. अमरावती विभागाचे अपक्ष शिक्षक आमदार किरण सरनाईक(Kiran sarnaik) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला असून पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. काही दिवसांपूर्वीच उबाठा गटाचे ६ खासदार आणि त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा धक्का ताजा असतानाच, आता सरनाईक यांच्या रूपाने विदर्भातील आणखी एक शिलेदार गळाला लावण्यात शिंदेंना यश आले आहे. या नव्या समीकरणामुळे पश्चिम विदर्भातील शिक्षकांच्या राजकारणावर शिवसेनेची पकड मजबूत होणार असून विरोधकांसमोर मात्र मोठे आव्हान उभे राहिले आहे.



आमदार किरण सरनाईक यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी करत विरोधकांना टोला लगावला. शिंदे म्हणाले, "गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी पक्षात प्रवेश केला, त्यानंतर सचिन अहिर आपल्यासोबत आले. आमच्याकडे आधीच प्रताप सरनाईक आहेत आणि आता हे दुसरे सरनाईक (किरण सरनाईक) पक्षात येत आहेत. शिक्षक आमदार किरण सरनाईक हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार असून, मी त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद नक्कीच वाढेल."


शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरण सरनाईक म्हणाले, "राज्याचे तडफदार नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पक्षात मानाचे स्थान दिले आहे. अमरावती विभागातील मतदारसंघाच्या विकासासाठी आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मला पूर्ण पाठबळ व आधार देण्याचे आश्वासन दिले आहे. या विश्वासाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे."




राजकीय समीकरणे बदलणार



किरण सरनाईक हे अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले असून, शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करणारे नेते म्हणून त्यांची विदर्भात ओळख आहे. त्यांनी घेतलेल्या या नव्या राजकीय भूमिकेमुळे पश्चिम विदर्भातील शिक्षक आणि सुशिक्षित वर्गात शिवसेनेचा जनाधार मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट