Sachin Ahir : विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोध

मुंबई : विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर शिवसेनेचे सचिन अहिर (Sachin Ahir) यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. या पदासाठी उबाठा गटाकडून ज.मो. अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, विधानपरिषद सभागृहाची परंपरा कायम राखण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार, सभागृहातील संख्याबळ आणि सभागृहाची परंपरा कायम राखण्यासाठी आमचा प्रस्ताव मागे घेण्याची विनंती सूचक आणि अनुमोदकांना करीत असल्याचे आमदार अनिल परब यांनी जाहीर केले. (Sachin Ahir)


सहा खासदारांनंतर विधान परिषेदेतील आमदार सचिन अहिर यांना सोबत घेत शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा उबाठाला जोरदार झटका दिला. विधानपरिषद आमदार तथा आदित्य ठाकरे यांचे शिलेदार सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत मंगळवारी, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला. उपसभापती पदासाठी अहिर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री संजय शिरसाट, आमदार कृपाल तुमाने, मनिषा कायंदे, दुष्यंत चतुर्वेदी, चंद्रकांत रघुवंशी आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या वतीने उबाठाचे आमदार ज.मो. अभ्यंकर यांनीही या पदासाठी अर्ज दाखल केला. (Sachin Ahir)



संख्याबळाचा विचार करता विधान परिषदेत सध्या सत्ताधारी महायुतीकडे स्वतःचे ५६ आमदारांचे भक्कम बळ आहे. याशिवाय काही अपक्ष आमदारांचाही पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता होती.. महायुतीचे पारडे जड असल्याने अहिर यांच्या विजयाचा मार्ग सोपा मानला जात होता. हे लक्षात घेता, संसदीय कार्यमंत्री पाटील यांच्या विनंतीनुसार उबाठा गटाने ज.मो. अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी त्यांचे अभिनंदन करीत सभागृहाच्या परंपरेनुसार त्यांना आसनावर विराजमान केले. (Sachin Ahir)




Comments
Add Comment

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी