UBT : उपसभापती पदाच्या निवडणुकीत उबाठाची किती मतं फुटणार?

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला. उबाठा गटाचे शिलेदार सचिन अहिर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. या घडामोडीनंतर आज (१ जुलै) दुपारी एक वाजता होणाऱ्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत 'उबाठा'ची आणखी किती मतं फुटणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वरळीत उबाठा गटाला खिंडार पाडल्यानंतर आता ठाकरेंचे आणखी एक विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांनाही गळाला लावण्याची तयारी शिंदेसेनेने सुरू केल्याने उबाठा गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. (UBT)


आज दुपारी होणाऱ्या या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आपापल्या आमदारांना ‘व्हीप’ (पक्षादेश) बजावला असून आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे. महायुतीकडून शिवसेनेचे सचिन अहिर विरुद्ध महाविकास आघाडीकडून उबाठाचे ज.मो. अभ्यंकर अशी ही लढत होत आहे. विधान परिषदेतील एकूण संख्याबळ पाहता सचिन अहिर यांचे पारडे कमालीचे जड मानले जात आहे. (UBT)



तांत्रिक अडचण अशी की, सचिन अहिर हे २०२२ मध्ये अविभाजित शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडून आले होते. आता अधिकृत पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे असल्याने अहिर यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे ठाकरे गटासाठी अडचणीचे ठरणार आहे. (UBT)



सुनील शिंदेंवर शिंदेंचा डोळा :


सचिन अहिर यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे वरळीतील दुसरे महत्त्वाचे नेते आणि आमदार सुनील शिंदे यांना सोबत घेण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. सुनील शिंदे हे २०२१ मध्ये 'धनुष्यबाण' चिन्हावरच निवडून आले असून त्यांची टर्म २०२७ मध्ये संपणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील उबाठाची ताकद पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी शिंदेसेनेने हे चक्रव्यूह रचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (UBT)



वरिष्ठांनी आत्मपरीक्षण करावं - सुनील शिंदे


सचिन अहिर यांच्या बंडानंतर सुनील शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. "आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आतातरी आत्मपरीक्षण करायला हवं. सचिन अहिर यांच्या हालचालींबद्दल मला आधीच कल्पना आली होती, पण मी एक छोटा कार्यकर्ता असल्याने त्यावर भाष्य करू शकत नव्हतो", असेही त्यांनी सांगितले. (UBT)



उबाठा गटाकडे किती आमदार?


१. अनिल परब
२. मिलिंद नार्वेकर
३. अंबादास दानवे
४. ज.मो. अभ्यंकर
५. सुनील शिंदे

Comments
Add Comment

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन