Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा



News: मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गुजरातमधील देशातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या मुंद्रा पोर्टला भेट देऊन तेथील आधुनिक सुविधा, बंदर व्यवस्थापन आणि पायाभूत विकास कामांचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील बंदरांचा सर्वांगीण आणि आधुनिक विकास करण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.




 


दौऱ्यात नितेश राणे यांनी कंटेनर हाताळणी व्यवस्था, डिजिटल तंत्रज्ञान, मालवाहतूक व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स नेटवर्क, साठवण सुविधा आणि जहाजांच्या जलद हालचालीसाठी विकसित करण्यात आलेल्या यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी केली. कार्यक्षम नियोजन आणि तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापनामुळे मुंद्रा पोर्ट देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले.



यावेळी अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक करण अदानी यांच्यासमवेत बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान, खाजगी गुंतवणूक आणि बंदर क्षेत्रातील संधींवर सविस्तर चर्चा झाली. (Port Development)





महाराष्ट्रातील बंदरांना अधिक सक्षम, स्पर्धात्मक आणि जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर, लॉजिस्टिक्स साखळी मजबूत करणे, मालवाहतुकीची क्षमता वाढविणे आणि बंदरांशी संबंधित औद्योगिक विकासाला चालना देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.



महाराष्ट्राला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्याचा प्रभावी वापर करून राज्यातील बंदरांचा आधुनिक विकास करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगत, देश-विदेशातील यशस्वी बंदरांच्या कार्यपद्धतीतील सर्वोत्तम बाबी महाराष्ट्रात राबविल्या जातील, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून