मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई, उपनगरांसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्यातील अनेक भागांत पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)
मुंबई, ठाणे आणि उपनगरात मुसळधार पाऊस :
मंगळवारी सकाळपासून मुंबई आणि पूर्व उपनगरात पावसाचा जोर वाढला आहे. घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पवई, कांजूरमार्ग आदी भागांत जोरदार सरी कोसळत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Maharashtra Monsoon Update)
मुंबई: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची ...
कोकणात पुढील काही तास महत्त्वाचे :
कोकण विभागात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Monsoon Update)
विदर्भात काही भागात पाऊस, काही ठिकाणी कोरडे हवामान :
विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत आजही कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. मात्र अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)
मराठवाड्यातही पावसाचा इशारा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील २०० लिटरची कमाल मर्यादा १ जुलै २०२६ पासून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरातील ...
नागपूरमध्ये पावसाने घेतली उसंत; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट :
नागपूर जिल्ह्यात जूनच्या तिसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर कुही, भिवापूर आणि उमरेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस व सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पावसाने अचानक उसंत घेतल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या माथी पडला आहे. (Maharashtra Monsoon Update)
हिंगोलीत उशिरा सुरू झाल्या खरीप पेरण्या :
हिंगोली जिल्ह्यात यंदा जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम उशिरा सुरू झाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर मात्र शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे ४.०७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार असून ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे आणि बैलजोडीच्या सहाय्याने शेतात लगबग सुरू आहे. मात्र पेरणी उशिरा झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आगामी काळात नियमित पाऊस झाल्यास पिकांची उगवण चांगली होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra Monsoon Update)






