वानखेडेच्या धर्तीवर कोकणात भव्य स्टेडियम उभारा; आमदार प्रवीण दरेकरांची विधानपरिषदेत मागणी

माणगाव, पोलादपूर आणि रत्नागिरी क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांना गती देणार - मंत्री अदिती तटकरे


मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या ( Wankhede Stadium) धर्तीवर कोकणातही एक भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण विनंती भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शासनाला केली. कोकणातील क्रीडा (Sports in Konkan) क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासनाने यावर सकारात्मक विचार करावा, असे दरेकर म्हणाले.


 

यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील क्रीडा संकुलाच्या सद्यस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आमदार दरेकर म्हणाले की, माणगाव येथील क्रीडा संकुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीला तडे गेले आहेत व छताची गळती होत आहे. २०२० मधील चक्रीवादळात येथील पत्रे उडून गेले होते, मात्र त्यानंतर झालेली दुरुस्ती पुरेशी ठरली नाही. क्रीडा साहित्य खराब झाल्यामुळे शेकडो तरुण खेळाडू सुविधांपासून वंचित आहेत. या संकुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच याच्या देखभालीची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर होती, त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच रत्नागिरी मुख्य क्रीडा संकुलाच्या प्रलंबित कामांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा आणि पोलादपूर तालुक्यासाठी नवीन क्रीडा भवन मंजूर करावे, असेही त्यांनी नमूद केले.



आमदार प्रवीण दरेकर (MLA Praveen Darekar) यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर उत्तर देताना संबंधित मंत्री अदिती तटकरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आणि क्रीडा संकुलांच्या विकासासाठी सरकार पूर्णपणे सकारात्मक असल्याचे सांगितले.मंत्री तटकरे म्हणाल्या की, कोकणातील श्रीवर्धन, तळा आणि रोहा या बहुतांश तालुक्यांमध्ये क्रीडा संकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. माणगाव क्रीडा संकुलाच्या इमारतीचे कामही मंजूर झाले होते, मात्र २०२० मधील निसर्ग चक्रीवादळामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. या परिसरात विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी ८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव क्रीडा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या कामाला गती देण्यासाठी लवकरच क्रीडा विभागाची विशेष बैठक घेण्यात येईल. तसेच नाशिक विभागाच्या धर्तीवर माणगाव येथे उपविभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.



पोलादपूर येथील क्रीडा भवनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तिथे तालुका क्रीडा भवन उभारण्यासाठी जागेचा प्रस्ताव मागवण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने क्रीडा विभागाकडे जागा हस्तांतरित केल्यास चालू वर्षामध्येच या क्रीडा भवनाला मंजुरी दिली जाईल. तसेच रत्नागिरीच्या मुख्य क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीबाबत विशेष बाब म्हणून सकारात्मक प्रस्ताव तयार केला जाईल, असे आश्वासनही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि