Devendra Fadnavis : नसरापूर'सारख्या गंभीर प्रकरणांत न्याय वेगाने मिळण्यासाठी प्रयत्न करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या वेगवान न्यायदानाचे विधानसभेत कौतुक



मुंबई : "पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्येचे प्रकरण अत्यंत अमानुष होते. या खटल्यात पोलीस, सरकारी पक्ष आणि न्यायालयाने दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या ५९ दिवसांत आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेतील हे एक आदर्श उदाहरण असून, आगामी काळातही अशा गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये पीडितांना अत्यंत वेगाने न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केला. नसरापूर प्रकरणातील नराधम भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तिहेरी फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या ऐतिहासिक न्यायदानाबाबत विशेष निवेदन केले.



विधानसभेत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या संपूर्ण खटल्याच्या वेगवान घटनाक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या संवेदनशील प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्यंत सक्षमपणे काम करत अवघ्या १४ दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर केवळ १६ दिवसांच्या कालावधीत तब्बल ५५ साक्षीदारांच्या साक्षी, तपासणी आणि उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २४ तास तत्पर राहून पोलिसांनी गोळा केलेले ठोस वैज्ञानिक व परिस्थितीजन्य पुरावे आणि विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडलेली प्रभावी बाजू यामुळेच या नराधमाला फाशीची शिक्षा देणे शक्य झाले आहे. २५ जून २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते आणि २९ जून २०२६ रोजी त्याला तिहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. घटना घडल्यापासून अवघ्या ५९ दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करून शिक्षा झाल्याने हा राज्याच्या न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा आणि नवीन बेंचमार्क ठरला आहे.




न्यायाधीशांनी सुट्ट्या रद्द करून घेतली सुनावणी



"पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी स्वतःच्या सुट्ट्या रद्द करून या प्रकरणाची नियमित आणि सातत्यपूर्ण सुनावणी घेतली. अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये समाजातील गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी गतीने न्याय मिळणे अत्यंत आवश्यक असते. न्यायमूर्ती साळुंखे(Salukhe) यांनी वेगवान न्यायदानासाठी घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. तसेच सक्षम तपास करणाऱ्या पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांसह त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि सरकारी वकिलांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पालकांचे दुःख भरून निघणार नाही, पण...



मुख्यमंत्री म्हणाले की, समाजात अशा अमानुष घटना घडूच नयेत ही आपल्या सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, दुर्दैवाने अशी घटना घडल्यास पोलीस, सरकारी वकील आणि न्यायालय यांनी समन्वयाने काम केले, तर अत्यल्प कालावधीत गुन्हेगाराला कठोर शिक्षा होऊ शकते हे या प्रकरणाने सिद्ध केले आहे. पीडित चिमुकलीच्या पालकांचे दुःख कोणत्याही शिक्षेने कधीही भरून निघणारे नाही; परंतु न्यायालयाने दिलेल्या या तिहेरी फाशीच्या निर्णयामुळे त्यांना न्याय मिळाल्याची भावना नक्कीच मिळेल, असे भावुक उद्गारही त्यांनी काढले.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील